स्मार्ट बुलेटिन | 27 मे 2020 | बुधवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. सीमेवर चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांसोबत बैठक, तिन्ही दलांनी तयारीच्या ब्लूप्रिंट पंतप्रधानांना सोपवल्या
2. 2091 नव्या कोरोनाबाधितांसह राज्यातील रुग्णसंख्या 54 हजार 758, 1168 जण कोरोनामुक्त तर एका दिवसात सर्वाधिक 97 जणांचा मृत्यू
3. जगभरात 56 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण, 24 तासात 92 हजार नवे कोरोनाबाधित तर चार हजार 55 जणांचा मृत्यू
4. कोरोना रुग्णांसाठीच्या उपचार सुविधेला गती, लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णसंख्येचा गुणाकार रोखण्यास मदत, रुग्ण दुपटीचा वेग 14 दिवसांवर आणण्यात यश, मुख्य सचिव अजोय मेहता यांची माहिती
5. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला ऑगस्ट महिन्याअखेरीस सुरुवात होण्याची शक्यता, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा विचार सुरु
6. रेल्वेमंत्री पियुष गोयल राजकारण करत आहे, गृहमंत्री अनिल देशमुख यांची टीका, श्रमिक स्पेशल ट्रेनच्या मुद्द्यावरुन केंद्र आणि महाराष्ट्र सरकार आमने-सामने
7. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचा खोटा प्रचार, देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारवर टीका, आतापर्यंत 28 हजार 14 कोटी रुपयांचा निधी दिल्याचाही दावा
8. राहुल गांधी महाराष्ट्रासोबत खंबीरपणे उभे, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्यांनी व्हिडीओ पुन्हा ऐकावा, महाआघाडीत बिघाडाच्या चर्चांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचं ट्वीट
9. धुळ्यात पाण्यासाठी नागरिकांचं रात्री उशिरापर्यंत मनपा प्रवेश द्वारावर ठिय्या आंदोलन, आठ-दहा दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचा संताप
10. महाबीजचे सोयाबीन बियाणे महागले, 30 किलोच्या बॅग मागे 360 रुपयांनी वाढ, 1890 रुपयांची बॅग आता 2250 रुपयांना मिळणार