एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 26 सप्टेंबर 2019 | गुरुवार | एबीपी माझा
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. पुणे शहरासह परिसरात अतिवृष्टीचा कहर, मुसळधार पावसामुळे नऊ जणांचा मृत्यू, तर वाहनं आणि अनेक घरांचंही नुकसान
2. अतिवृष्टीमुळे पुणे शहरासह हवेली, भोर, पुरंदर, बारामतीमधल्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, तर पुढील पाच दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा, वीजपुरवठ्यावरही परिणाम
3. सातारा, सांगलीत मुसळधार पाऊस, येरळा नदी दुथडी तर माणगंगा नदीला पूर, लातुरातही धो धो पाऊस, दुष्काळी पट्ट्यातला शेतकरी सुखावला
4. भाजपमध्ये येणारे सगळे साधुसंत नाहीत, हे खरं आहे, माझाच्या तोंडी परीक्षेत शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य
5. मुंबईमधील नगरसेवकांच्या कामगिरीत घसरण, नागरिकांच्या समस्यांबाबत अनास्था, प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून माहिती उघड
6. छत्रपतींचा महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे झुकणार नाही, ईडीच्या कारवाईनंतर शरद पवारांचं थेट आव्हान, पवारांच्या समर्थनात राज्यभर राष्ट्रवादीचं आंदोलन
7. शरद पवार यांनी कधीही भ्रष्टाचार केला नाही, राजू शेट्टींकडून पवारांची पाठराखण
8. नवी मुंबईतल्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंकडून युतीचे स्पष्ट संकेत, युतीचच सरकार येणार असल्याचा दोन्ही नेत्यांचा दावा, जागावाटपावर मात्र मौन
9. काँग्रेसला आलेली मरगळ झटकण्यासाठी राहुल गांधी निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरणार, गांधी जयंतीला वर्ध्यातून पदयात्रा, प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता
10. देशातल्या नऊ बँका बंद करण्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, रिझर्व्ह बँकेचं स्पष्टीकरण, खातेदारांनी घाबरण्याचं कारण नाही
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
बातम्या
राजकारण
Advertisement