स्मार्ट बुलेटिन | 26 सप्टेंबर 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. ड्रग्ज प्रकरणात आज दीपिका, सारा आणि श्रद्धाची चौकशी होणार, दीपिका आणि करिश्मा प्रकाश यांची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता
2. माझ्या घरी झालेल्या पार्टीत ड्रग्जचं सेवन झाल्याचं वृत्त करण जोहरने फेटाळलं, तर क्षितीज प्रसादचा धर्मा प्रॉडक्शनशी कोणताही संबंध नसल्याचं करणचं स्पष्टीकरण
3. मुंबईतील केईएम रुग्णालयात आज ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी, तीन स्वयंसेवकांना डोस देणार, अधिष्ठातांची माहिती
4. परभणीत आजपासून 5 दिवस जनता कर्फ्यू, व्यापारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधींचा विरोध तर नागपुरातही आज आणि उद्या जनता कर्फ्यू
5. मेडिकल प्रवेश प्रक्रियेत विभागानुसार 70:30 कोटा रद्द करण्याच्या सरकारच्या परिपत्रकाविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका
6. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी नाशिकमध्ये संभाजीराजेंच्या उपस्थितीत मराठा संघटनांची बैठक, तर बारामतीमध्ये अजित पवारांच्या घराबाहेर ढोल बजाओ आंदोलन
7. महाराष्ट्रात सुटी सिगारेट, विडी विक्री करण्यास बंदी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय
8. बेकायदेशीर बांधकाम केलं नाही, सर्व परवानग्या घेतल्या, बीएमसीने कारवाई करताना कायद्याला हरताळ फासला, कंगना रनौतचा हायकोर्टात आरोप
9. वकिलांची फी देण्यासाठी दागिने विकले, उद्योजक अनिल अंबानी यांची इंग्लंडच्या कोर्टात माहिती, एकच कार मालिकीची असल्याचाही दावा
10. चेन्नई सुपर किंग्जचा यंदाच्या मोसमातील सलग दुसरा पराभव, दिल्ली कॅपिटल्सची चेन्नईवर धावांनी मात