एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 26 जून 2020 | शुक्रवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. राज्यात 28 तारखेपासून सलून, ब्युटी पार्लर्सना परवानगी, फक्त केस कापायला परवानगी; त्वचेचा स्पर्श होईल अशा सेवांवर निर्बंध 2. स्पेशल सेवांव्यतिरिक्त सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वे 12 ऑगस्टपर्यंत धावणार नाही; रेल्वे मंत्रालयाची माहिती, तर फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच लोकल धावणार 3. काल दिवसभरात राज्यात 4 हजार 841 नवे कोरोनाग्रस्त, आजपर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक वाढ; महाराष्ट्रात आज 192 कोरोना बाधितांचा मृत्यू 4. जगभरात कोरोना बाधितांची संख्या 97 लाखांवर; गेल्या 24 तासांत 1.76 लाख नवे कोरोना बाधित, आतापर्यंत एकूण 4 लाख 90 हजार 933 रुग्णांचा मृत्यू 5. कोरोनामुळे रुग्णालयाबाहेर झालेले एक हजार मृत्यू दडवले, देवेंद्र फडणवीसांकडून मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा लक्ष्य, काटेकोरपणे लक्ष देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 26 जून 2020 | शुक्रवार | ABP Majha 6. पोलीस दलात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच, गेल्या 24 तासांत मुंबई पोलीस दलामध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू, तर आतापर्यंत एकूण 37 पोलीस कर्मचारी मृत्यूमुखी 7. लॉकडाऊनच्या काळात सोन्याला पुन्हा झळाळी, सोनं 50 हजारांच्या घरात, 2021 पर्यंत सोन प्रतितोळा 80 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता 8. भारत-चीन सीमावादावरून काँग्रेस मोदी सरकारला घेरण्याच्या तयारीत, देशभरात आज शहीद श्रद्धांजली वाहण्याचा काँग्रेसचा कार्यक्रम 9. गृहखाते असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मस्ती आली, भाजप नेते निलेश राणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा; गोपीचंद पडाळकरांविरोधात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरही टीका 10. दक्षिण आशियामध्ये सैन्य तैनात करण्याचा अमेरिकेचा निर्णय, चीनच्या वाढत्या कुरापतींमुळे सैन्य तैनात करणार; भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णयअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
पुणे
निवडणूक
Advertisement