एक्स्प्लोर
Advertisement

(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन | 26 जून 2019 | बुधवार | एबीपी माझा
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

- मुंबई मनपाच्या रुग्णालयांना होणारा औषध पुरवठा आजपासून बंद, काळ्या यादीत टाकल्यानं औषध पुरवठादार संघटनेचा निर्णय, रुग्णांचे हाल होण्याची शक्यता
- मुंबईत बेस्ट बसचं किमान भाडं 8 वरुन 5 रुपयांवर, उत्पन्न वाढीसाठी प्रस्ताव मंजूर, तर पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही मॉल्समध्ये पार्किंग मोफत
- 'मातोश्री'जवळच्या नाल्याची सफाई न झाल्याने महापौरांची मुख्य अभियंत्यांसोबत शाब्दिक चकमक, आदेश देऊनही हा नाला साफ न झाल्यानं महापौर संतापले
- महाराष्ट्रात सर्वदूर मान्सून पोहोचल्याची हवामान खात्याची वर्दी, मात्र प्रत्यक्षात राज्याचा अनेक भाग कोरडाच, तर महाराष्ट्राच्या चेरापुंजीतही पावसाची प्रतिक्षा
- ज्ञानोबा आणि तुकोबांची पालखी आज पुणे मुक्कामी, दुपारी संगमवाडी पुलावर दोन्ही पालख्यांचा संगम, तर भिडेंना माऊलींच्या पालखीसमोर चालण्याची परवानगी नाही
- सप्टेंबरपासून राज्यात विधानसभेची आचारसंहिता, तर 15 ते 20 ऑक्टोबरदरम्यान निवडणूक, महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांचं भाकीत
- काँग्रेस पक्ष इतका उंच गेला आहे की त्यांना जमीन दिसत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र
- गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर, अमरनाथ यात्रेकरुंच्या सुरक्षेचा आढावा घेणार, फुटीरतावाद्यांविरोधात कडक भूमिका
- फरार मेहुल चोकसीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, अँटिग्वा सरकारकडून चोकसीचं नागरिकत्व रद्द, लवकरच प्रत्यार्पण होण्याची शक्यता
- विश्वचषकाच्या रणांगणात आज पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी, पाकिस्तानसाठी करो या मरो तर सामना जिंकल्यास न्यूझीलंड उपांत्य फेरीत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
