स्मार्ट बुलेटिन | 13 मार्च 2020 | शुक्रवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. कोरोनाचा देशात पहिला बळी, कर्नाटकातील कलबुर्गीत सौदीतून आलेल्या 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, महाराष्ट्रात कोरोनाचे 14 रुग्ण
2. कोरोनामुळे शेअर बाजारात साडे नऊ लाख कोटीचं नुकसान, तर परराष्ट्र मंत्रालयाकडून आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचा सल्ला
3. कॉलेज-शाळांना सुट्टी जाहीर करावी, कोरोनाच्या भीतीपोटी पालक संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, तर प्रस्ताव आल्यास विचार करु, शिक्षणराज्यमंत्री बच्चू कडूंचं आश्वासन
4. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांच्याकडून कविता, स्वच्छता राखण्याचं आवाहन तर अक्षय कुमारने सूर्यवंशीचं प्रदर्शन पुढे ढकललं
5. कोरोनामुळे इराणमध्ये अडकलेल्या 120 भारतीयांची आज सुटका होणार, लष्कराकडून जैसलमेर आणि जोधपूरमध्ये खास क्वॉरन्टाईन वॉर्ड तयार
6. एनपीआरसाठी कोणतीही कागदपत्र मागितली जाणार नाही, गृहमंत्री अमित शाह यांची राज्यसभेत माहिती, एनपीआरला घाबरण्याची गरज नसल्याचंही आवाहन
7. रावसाहेब दानवेंच्या मुलीची पती आणि सासूविरोधात तक्रार, हर्षवर्धन जाधव यांच्यावर मारहाणीचा आरोप तर जाधवांच्या आईकडूनही विरोधात तक्रार
8. भारत-दक्षिण आफ्रिका संघांमधील उर्वरित दोन वनडे सामने प्रेक्षकांविनाच खेळवले जाणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचा निर्णय
9. यंदा डोंबिवलीआणि ठाण्यातील नववर्षाच्या स्वागतयात्रांवरही कोरोनाचं सावट, जिल्हाधिकाऱ्यांची स्वागतयात्रा संयोजकांसोबत, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष
10. आंबा निर्यातीलाही कोरोनाचा फटका, हवाईमार्गे होणारी 80 टक्के निर्यात बंद; उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता