Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 07 जून 2021 | सोमवार | ABP Majha
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. पावणे दोन महिन्यांच्या निर्बंधांनंतर आजपासून महाराष्ट्र अनलॉक, मुंबईसह महत्वाच्या शहरांमध्ये हॉटेल, जिम, सलून, थिएटर्सची शटर्स उघडली
2. नियम तोडलेले खपवून घेणार नाही, जिल्हाधिकारी आणि आयुक्तांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची ताकीद, परिस्थिती पाहून निर्बंध लागू करण्याचं प्रशासनाला स्वातंत्र्य
3. देशात दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट, नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक, अनेक राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु
4. नागपुरात लहान मुलांवर कोवॅक्सिन लसीची ट्रायल, 12 ते 18 वयोगटातील 50 स्वयंसेवकांवर चाचणी, मेडिट्रिना रुग्णालयात चाचणीचा पहिला टप्पा
5. महागाई विरोधात आज राज्यभर काँग्रेसचा एल्गार, एकाचवेळी एक हजार ठिकाणी आंदोलन करणार, इंधन दरवाढीसह महागाईचाही निषेध
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 07 जून 2021 | सोमवार | ABP Majha
6. मुंबई आणि लगतच्या उपनगरात रिमझिम सरी, तर नवी मुंबईत जोरदार पावसाची हजेरी, मान्सूनच्या आगमनामुळं ग्रामीण महाराष्ट्रात शेतीच्या कामांची लगबग वाढली
7. फेसबुकनं दिल्लीतील तरुणाचे वाचवले प्राण, एफबी लाईव्ह करत आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाबाबत दिल्ली पोलिसांना कळवलं, अनर्थ टळला
8. नवी मुंबई पालिका शाळांतील गरीब विद्यार्थ्यांना मोबाईल रिचार्जसाठी एक हजार रुपये, आयुक्तांचा निर्णय, शिक्षणात खंड पडू नये यासाठी 6 महिन्यापर्यंत अनलिमिटेड डेटा
9. 85 वर्षाच्या वृद्धाकडून पत्नीला बेदम मारहाण, कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल, सर्व स्तरातून संताप व्यक्त
10. आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात होर्डिंगसाठी झाडं कापली, भाजप नेते प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर हल्लाबोल, तर आरोप सिद्ध करा महापौरांचं आव्हान