एक्स्प्लोर
Advertisement
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 08 फेब्रुवारी 2020 | शनिवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. कृषी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी 15 एप्रिलपर्यंत करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश, 21 फेब्रुवारीपासून गावनिहाय याद्या प्रसिद्ध होणार
3. शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या रद्द होण्याची शक्यता, जिल्हा परिषदेकडे पुन्हा अधिकार देण्याच्या हालचाली
3. सरकारने शिक्षकांना पुन्हा त्रासात ढकलू नये, ऑनलाईन बदल्या रद्द होण्याच्या शक्यतेवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया
4. मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीसा, घुसखोरांना हाकलून देण्याच्या मागणीसाठी उद्या गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा
5. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान, अरविंद केजरीवालांचा गड भेदण्यासाठी भाजपचे सर्वतोपरी प्रयत्न, निवडणूक प्रतिष्ठेची केल्यानं भाजपच्या कामगिरीकडे लक्ष
6. हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विकेश नगराळेची आज कोर्टात हजेरी, कोर्ट परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त, तर पीडितेची प्रकृती अजूनही चिंताजनक
7. पश्चिम रेल्वेवर आज रात्री चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जम्बो मेगाब्लॉक, फेरे ब्रीजचं तोडकाम करणार, विरार ते मुंबई सेंट्रलपर्यंत लोकलसेवा सुरु राहणार
8. मुंबईकरांना आता घरातल्या कचऱ्यावरही कर द्यावा लागणार, रिअल इस्टेटचा व्यवसाय सुस्तावल्यानं पालिकेच्या तिजोरीला फटका, घटलेलं उत्पन्न भरुन काढण्याचा प्रयत्न
9. स्टेट बँकेचे गृह कर्ज वार्षिक 8 टक्क्यांच्या खाली, 10 फेब्रुवारीपासून निर्णयाची अंमलबजावणी, ठेवींवरील व्याजदरात मात्र कपात
10. भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना आज, मालिकेत स्थान राखण्यासाठी टीम इंडियाला विजय गरजेचा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
क्राईम
भारत
राजकारण
Advertisement