Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 19 एप्रिल 2021 | सोमवार | ABP Majha
महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 19 एप्रिल 2021 | सोमवार | ABP Majha
1. कोरोनामुळे महाराष्ट्रात प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला एका रुग्णाचा मृत्यू, तर प्रत्येक तासाला तीन हजार नव्या रुग्णांची भर, काल 68 हजार 631 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
2. केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडहून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक, वाढत्या कोरोना संसर्गामुळे निर्णय
3. विशाखापट्टणमहून ऑक्सिजन आणण्यासाठी कळंबोलीहून एक्स्प्रेस रवाना होणार, ऑक्सिजन एक्स्प्रेससाठी रेल्वेकडून ग्रीन कॉरिडोर
4. एबीपी माझाच्या बातमीनंतर ऑक्सिजन निर्मितीच्या प्रक्रियेला वेग, बीडच्या अंबाजोगाईमध्ये ऑक्सिजन निर्मितीची तयारी, तर परळीतील प्लांट परभणीला स्थलांतरित
5. यवतमाळच्या पुसद उपजिल्हा सामान्य रुग्णालयात 10 व्हेंटिलेटर 7 महिन्यांपासून धूळखात, तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या अभावामुळे इन्स्टॉलेशन झालं नाही, रुग्णालयाची माहिती
6. कोणत्याही चौकशीला तयार ब्रुक्स फार्मा कंपनी प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाच्या आरोपांनंतर फडणवीस यांचं प्रत्युत्तर, रेमडेसिवीरवरुन राजकारण शिगेला
7. 30 एप्रिलपर्यंत लस टोचून न घेतल्यास औरंगाबादेत दुकानं उघडण्यास परवानगी न देण्याचा विचार, लसीकरण वाढवण्यासाठी पालिका आयुक्तांचा अल्टिमेटम
8. नाशिकमध्ये संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांकडून ड्रोनचा वापर, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर आकाशातून नजर
9. लातूरमध्ये पोकलेनचा विचित्र स्फोट; हवेत उडालेले स्पेअर पार्ट्स लागून दोघांचा मृत्यू तर चालक गंभीर जखमी, स्फोटाचं कारण अस्पष्ट
10. मुलींचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून पित्याकडून टोकाचं पाऊल, ट्रकखाली दोन लेकींना चिरडलं, पुण्यातल्या मावळमधील घटनेने महाराष्ट्र हादरला