Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन :16 सप्टेंबर 2021 : गुरुवार : ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन :16 सप्टेंबर 2021 : गुरुवार : ABP Majha
1. आयकरच्या अधिकाऱ्यांची सोनू सूदच्या घराची आणि हॉटेलची तब्बल 20 तास पाहणी, आयकरच्या ऑपरेशनवर अरविंद केजरीवालांचं खोचक ट्वीट
2. राज्य सरकारच्या अध्यादेशामुळं ओबीसीच्या 10 ते 15 टक्के जागा घटण्याचा अंदाज, पोटनिवडणुकीत कोणताच फायदा होणार नाही, मराठा क्रांती मोर्चा अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार
3. मुंबईत राहाणारा कथित दहशतवादी जान मोहम्मदची दिल्लीत जाऊन एटीएस चौकशी करणार, जान मोहम्मद 20 वर्षांपासून दाऊदच्या संपर्कात
4. दहशतवाद्यांचा घातपाताचा कट उधळल्यानंतर मुंबई 'हायअलर्ट'वर; मुंबई लोकलच्या सुरक्षेसाठी नवं मॉडल उभारणार
5. देशातलं श्रीमंत देवस्थान तिरुपती ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिफारसीनंतर मानाचं पद
6. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, शांताबाई फेम संजय लोंढे, गायिका देवयानी बेंद्रे राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अजित पवार आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीत होणार प्रवेश
7. मुंबईत गणेशोत्सवाचे आफ्टर इफेक्ट, कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; काल दिवसभऱात 514 रुग्णांची नोंद
8. पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांचं पुरवणी आरोपपत्र कोर्टात सादर, राज कुंद्रासह त्याचा सहकारी रयन थॉर्पविरोधात गंभीर आरोप
9. पुणे-सातारा महामार्गावर बेकायदा टोलवसुली विरोधात हायकोर्टात याचिका, रिलायन्स इन्फ्रावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
10. अंतराळातल्या पर्यटनाचा श्रीगणेशा, चार जणांना घेऊन स्पेसएक्सच्या यानाची अंतराळात यशस्वी भरारी