एक्स्प्लोर

ABP Majha Zero Hour Show : मत तुमचं व्यासपीठ 'माझा'चं, आता चर्चा फक्त जनहिताचीच; एबीपी माझाचा 'झीरो अवर' कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला

ABP Majha Zero Hour Show : एबीपी माझाचा नवा कोरा कार्यक्रम 'झीरो अवर' हा आजपासून सुरु होणार आहे. या कार्यक्रमामध्ये जनहिताची चर्चा ही सोशल मिडियाच्या माध्यमातून होणार आहे.

ABP Majha Zero Hour Show : 'एबीपी माझा' (Abp Majha) आणि मराठी माणूस हे नातं काही नवं नाही.  गेल्या सतरा वर्षांपासून तमाम मराठी प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच 'एबीपी माझा'नं सातत्यपूर्ण नवे प्रयोग केले आहेत. सध्या चुकीच्या बातम्या आणि  बातम्यांच्या नावाखाली मनोरंजनाचा खेळ सतत सुरु असतो. यामुळे तुमचे आणि तुमच्या हक्काचे प्रश्न हे बाजूला राहतात. पण आता 'एबीपी माझा' तुमच्याच माध्यमातून तुमच्या प्रश्नांना वाचा फोडणार आहे. माझाच्या या कार्यक्रमात आता फक्त आमचे प्रतिनिधीच नाही तर तुम्ही देखील सहभागी होणार आहात. एबीपी माझाचा 'झीरो अवर' हा कार्यक्रम 14 ऑगस्ट पासून तुमच्या भेटीला येत आहे. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7.56 ची वेळ आता ही माझाच्या प्रेक्षकांची असणार आहे. 

'माझा'वर आता चर्चा जनहिताचीच

'एबीपी माझा'च्या उपकार्यकारी संपादिका सरिता कौशिक या 'झीरो अवर' हा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.  राजकीय बातम्यांच्या वादळात सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या, नोकरदारांच्या सगळ्यात महत्वाचं महिलांच्या बातम्या बाजूला पडत असल्याचं चित्र सध्या आहे. यामुळे अनेक प्रश्न बाजूला राहत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक महत्त्वाचे विषय मागे पडतात. पण 'माझा' नेहमीच प्रत्येक विषय आपला म्हणून मांडत असतो. आता देखील तुमचे, आमचे, आपले प्रश्न नागरिकांना 'माझा'च्या व्यासपीठावर मांडता येणार आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

कसं व्हाल जनहिताच्या चर्चेत सहभागी

फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही 'झीरो अवर' या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. त्यामुळे जर तुम्ही सोशल मिडियावर 'एबीपी माझा'ला फॉलो करत नसाल तर लगेच 'एबीपी माझा'ला फॉलो करा. एबीपी माझाला फॉलो केल्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन पाठवण्यात येईल. ज्यात आम्ही दिवसभरातील एका महत्वाच्या विषयावर प्रश्न विचारणार आहोत. पण त्यावर तुम्ही उत्तर द्यायलाच हवं असं काही बंधनकारक नाही. त्या प्रश्नावर तुम्ही फक्त तुमचं मत दिलं तरी चालेल. त्याच विषयावर तुम्ही 'माझा'च्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनाही प्रश्न विचारु शकता. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला 'माझा'वर तुमचं मत मांडण्याची संधी देखील मिळणार आहे. म्हणजेच, सोशल मीडियावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रियाआम्ही 'माझा'च्या 'झीरो अवर' या कार्यक्रमात दाखवणार आहोत. त्यामुळे आता लगेच एबीपी माझाला सोशल मिडियावर फॉलो करा आणि तुमचं, तुमच्या विषयांचं मत मांडा. 

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नियम आणि अटी

18 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तीच या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच तुमच्या सोशल मिडियावरील नावासकट तुमच्या पोस्ट, ठिकाण आणि छायाचित्रं देखील प्रसारित करण्यासाठी तुम्ही ABP Network Private Limited (“ABP”) ला अधिकृत परवानगी देता आहात. नियम व अटी लागू 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Embed widget