ABP Majha Impact : औरंगाबादमधील लसीकरणाच्या काळाबाजार प्रकरणी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे कारवाईचे आदेश
एबीपी माझाच्या छुप्या कॅमेऱ्यानं लशीचा काळाबाजार करणाऱ्यांना औरंगाबादमध्ये कैद केलं आहे. एबीपी माझाच्या या बातमीनंतर कारवाई करण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

औरंगाबाद : औरंगाबादमधील लसीकरणाच्या काळाबाजार प्रकरणी राजेश टोपे यांचे कारवाईचे आदेश दिले आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना संबंधित घटनेचा एका दिवसात रिपोर्ट देण्याचे आरोग्य मंत्र्यांनी आदेश दिले आहे. एबीपी माझाने औरंगाबादमध्ये स्टिंग ऑपरेशनद्वारे लसीच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश केला. या बातमीनंतर कारवाई करण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
राजेश टोपे म्हणाले, कुठेतरी यंत्रणेमधील त्रुटी नाहीतर जाणीवपूर्वक केलेली चूक आहे. आरोग्य सेवक गणेश दुरोळेला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यात जे इतर कोणी दोषी आढळतील किंवा निष्काळजीपणा केलेला असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे. राज्यात इतरत्र असा विषय होत नसावा. मात्र राज्यातील संपूर्ण लसीकरण केंद्रावर कडक नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. ही गोष्ट अत्यंत निषेधार्ह आणि चुकीची अशा गोष्टी घडू नयेत याची काळजी घेतली जाईल, असेही टोपे म्हणाले.
Corona Vaccine Black Marketing Aurangabad : कोरोना लसींचा काळाबाजार,'माझा'चं स्टिंग ऑपरेशन EXCLUSIVE
काय आहे प्रकरण?
दररोज सरकारी लसीकरण केंद्रावरच्या 30 ते 40 लसी चोरून, त्याची चोरीछुपे विक्री करणारा गणेश दुरोळे एबीपी माझाच्या छुप्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरलेल्या लशीची विक्री करण्यासाठी गणेश दुरोळे काही कामगारांना एका खोलीत बोलवत असे. आणि 300 रुपयांच्या मोबदल्यात प्रत्येकाला लस टोचत असे. औरंगाबादच्या वाळूजजवळच्या साजापूरमधला आरोग्य सेवक गणेश दुरोळे लशी चोरुन त्याची विक्री करत होता. दरम्यान एबीपी माझाच्या छुप्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या गणेश दुरोळेला औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
स्टिंग ऑपरेशननंतर अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. लस चोरुन त्याची विक्र करणारा आरोग्य सेवक गणेश दुरोळे हा तर छोटा मासा आहे, त्याच्या डोक्यावर नेमका कुणाचा हात? लशीच्या काळाबाजारातले मोठे मासे कोण आहेत? हे रॅकेटची पाळमुळं कुठवर पसरली आहेत? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. दरम्यान औरंगाबादमधला प्रकार हे हिमनगाचं टोक असू शकतं... महाराष्ट्रभर लशीचा काळाबाजार सुरु असू शकतो अशी शक्यता पुण्यातले सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
