Corona Vaccine Black Marketing Aurangabad : कोरोना लसींचा काळाबाजार,'माझा'चं स्टिंग ऑपरेशन EXCLUSIVE
जवळपास अर्धा महाराष्ट्र कोरोनाच्या लशीपासून वंचित आहे... लाखो जणांची सकाळ लशीच्या रांगेत सुरु होते... तरी देखील त्याला डोस मिळेल याची शाश्वती नसते.. काही जणांना परवडत नसतानाही पदरचे पैसे मोडून खाजगी केंद्रावर लस घ्यावी लागतेय..... तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोना लशीचा सर्रास काळाबाजार सुरु आहे. एबीपी माझाच्या छुप्या कॅमेऱ्यानं लशीचा काळाबाजार करणाऱ्यांना कैद केलंय.. तुमच्या आमच्या हक्काच्या लसीवर डल्ला मारणाऱ्यांमध्ये सरकारी कर्मचारीच आघाडीवर आहे. औरंगाबादमध्ये त्याचं एक उदाहरण समोर आलंय. दररोज सरकारी लसीकरण केंद्रावरच्या ३० ते ४० लसी चोरून, त्याची चोरीछुपे विक्री करणारा गणेश दुरोळे एबीपी माझाच्या छुप्या कॅमेऱ्यात कैद झालाय.. चोरलेल्या लशीची विक्री करण्यासाठी गणेश दुरोळे काही कामगारांना एका खोलीत बोलवत असे. आणि ३०० रुपयांच्या मोबदल्यात प्रत्येकाला लस टोचत असे... हे तर फक्त औरंगाबादचं उदाहरण समोर आलं असेल.. असा काळाबाजार, तुमच्या आमच्या, किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रभर सुरु असल्याची शंका व्यक्त करण्यात येतेय... एबीपी माझानं केलेल्या या स्टिंग ऑपरेशनुमळं लशींचा काळाबाजार आता चव्हाट्यावर आलाय..
![Chandrashekhar Bawankule PC | योजना बंद ते लाडक्या बहिणींचं बजेट, बावनकुळेंची पत्रकार परिषद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/0093bc863ece82093f0c432c9a8bb82a1739717193950718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ajit Pawar PC Nashik | धनंजय मुंडेंनी ठरवावं की राजीनामा द्यावा का? अजित पवार स्पष्टच म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/d3cb968e47c7016316edc5cf8ec2984b1739716914406718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![CM Devendra Fadnavis : कोण-कोणाला भेटलं यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/3ae832ef4285510d4269bc3cb80c730a1739714059642718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sushma Andhare : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/9d97540725ba735b2742c53d6310338a1739708921135718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/7ae6ccea4938be66aa562bb75ed173081739706263697718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)