Abdul Sattar on Supriya Sule : 'सॉरी म्हणतो, शब्द मागे घेतो'; राज्यभरातून होणाऱ्या विरोधानंतर अब्दुल सत्तारांची माफी
Abdul Sattar on Supriya Sule : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. सत्तार यांच्या गलिच्छ भाषेतील टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
![Abdul Sattar on Supriya Sule : 'सॉरी म्हणतो, शब्द मागे घेतो'; राज्यभरातून होणाऱ्या विरोधानंतर अब्दुल सत्तारांची माफी Abdul Sattar apology for his statement about NCP MP Supriya Sule Abdul Sattar on Supriya Sule : 'सॉरी म्हणतो, शब्द मागे घेतो'; राज्यभरातून होणाऱ्या विरोधानंतर अब्दुल सत्तारांची माफी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/07/06829f6adbad1f13605776057f907b891667817134982328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : "मी कोणत्याही महिला भगिनींच्या बाबतीत अपशब्द बोललो नाही. आम्हाला जे बदनाम करत आहेत, त्यांच्याबद्दल बोललो आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिय सुळे (Supriya Sule ) यांच्याबद्दल किंवा कोणत्याच महिलेबद्दल मी काहीच बोललो नाही. महिलांची मने दुखावतील असा कोणताच शब्द बोललो नाही. परंतु, माझ्या बोलण्याने जर कोणाची मने दुखावली असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आणि माझा शब्द मागे घेतो, सॉरी म्हणतो असे म्हणत अब्दुल सत्तार (Abdul Sattar ) यांनी महिला वर्गाची माफी मागितली आहे.
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. सत्तार यांच्या गलिच्छ भाषेतील टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राज्यभर राष्ट्रवादीकडून सत्तारांविरोधात निदर्शने केली जात आहेत. त्यामुळे वाढता विरोध पाहून अखेर सत्तारांनी आपले शब्द मागे घेतो असे म्हटले आहे.
"मी जे बोललो ते फक्त खोक्यांच्याबद्दल बोललो. परंतु, त्याचा कोणी वेगळा अर्थ काढू नये. मी महिलांचा सन्मान करणारा नेता आहे. मी कोणत्याही महिलेच्या विरोधात बोललो नाही, असं अब्दुल सत्तार यांनी यावेळी म्हटले. परंतु, माफी मागत असताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांचं नाव घेण्याचं टाळलं आहे.
काय म्हणाले होते सत्तार?
औरंगाबादच्या सिल्लोड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. याचवेळी 'एबीपी माझा'शी बोलताना विरोधकांवर सत्तार यांनी टीका केली. आम्हाला खोके म्हणणारे लोक भिका*** असल्याचं सत्तार म्हणाले. तर सुप्रिया सुळे यांचा देखील सत्तार यांनी असाच उल्लेख केला. विशेष म्हणजे एकदा नाही तर दोनवेळा सत्तार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं.
दरम्यान, सत्तार यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध करण्यात येत आहे. सत्तार यांच्या वक्तव्याने समस्त महिला वर्गाचाअपमान झाला आहे. त्यामुळे सत्तार यांनी आपले शब्द मागे घ्यावेत अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. अब्दुल सत्तार यांनी 24 तासाच्या आत माफी मागितली नाही तर दिसेल तिथे झोडपून काढू, असा इशारा राष्ट्रवादीनं दिला आहे. यांना 50 खोक्यांची मस्ती आली आहे, यांची मस्ती उतरवली जाईल, असं देखील राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
Aurangabad News : अब्दुल सत्तार यांची गलिच्छ भाषेत टीका, सुप्रिया सुळे म्हणतात...
Abdul Sattar: '24 तासात माफी मागा नाहीतर दिसेल तिथे झोडपून काढू'; अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादीचं अल्टिमेटम, राजीनामा देण्याचीही मागणी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)