(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad News : अब्दुल सत्तार यांची गलिच्छ भाषेत टीका, सुप्रिया सुळे म्हणतात...
Aurangabad News : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली. आता सुप्रिया सुळे यांची भूमिका समोर आली आहे.
Aurangabad News : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर केलेल्या गलिच्छ भाषेतील टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त करत आपले शब्द मागे घ्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जात आहे. यावर आता स्वत: सुप्रिया सुळे यांची भूमिका समोर आली आहे. "मी यावर भाष्य करणार नाही," असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
अब्दुल सत्तार यांची सुप्रिया सुळेंवर गलिच्छ भाषेत टीका
औरंगाबादच्या सिल्लोड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. दरम्यान याचवेळी 'एबीपी माझा'शी बोलताना विरोधकांवर सत्तार यांनी टीका केली. आम्हाला खोके म्हणणारे लोक भिका*** असल्याचं सत्तार म्हणाले. तर सुप्रिया सुळे यांचा देखील सत्तार यांनी असाच उल्लेख केला. विशेष म्हणजे एकदा नाही तर दोनवेळा सत्तार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यामुळे आता राज्यभरातून त्यांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे. तर सत्तार यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी केली जात आहे.
सुप्रिया सुळेंची भूमिका
या सगळ्यावर सुप्रिया सुळे यांनी मात्र संयमी भूमिका घेतली आहे. आपण अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, असं त्या म्हणाल्या. परंतु दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस मात्र आक्रमक झाली असून त्यांनी अब्दुल सत्तार यांनी माफी मागण्यास सांगितलं आहे.
अब्दुल सत्तार वक्तव्यावर ठाम
अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. परंतु आपण त्या वक्तव्यावर ठाम असल्याचं आणि तोच शब्द वापरणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. मी जी भाषा वापरली त्यावर मी ठाम आहे, माझी जर कोणी बदनामी करत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असं अब्दुल सत्तार म्हणाले. अब्दुल सत्तार हे खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, की, काही लोकांच्या डोक्यामध्ये खोके आहेत. ज्याच्या ज्याच्या तोंडामध्ये खोके येतात त्यांचं डोकं तपासावं लागेल. काही लोकांना रात्री स्वप्नातही खोकी दिसतात.
संबंधित बातम्या
कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंवर गलिच्छ भाषेत टीका, राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक