एक्स्प्लोर

वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू, बाळा नांदगावकरांच्या वक्तव्यावर नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू, अशी सूचक प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती. यावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Aaditya Thackeray : तब्बल 20 वर्षांनतर मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी वेगळे झालेले दोन ठाकरे बंधु एकत्र आले आहेत. त्यामुळे आगामी काळात दोन राजकीय पक्ष एकत्र येत निवडणुका सोबत लढवतील अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. मात्र अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज ठाकरेंचे (Raj Thackeray)  अतिशय विश्वासू आशा बाळा नांदगावकरांनी युतीसंदर्भात मोठं विधान केलं आहे. आतापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू, अशी सूचक प्रतिक्रिया नांदगावकर यांनी दिली. यावर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

5 जुलैला आम्ही एकत्र आलो होतो स्पष्टपणे ते एका गोष्टीसाठी, ती म्हणजे तिसऱ्या  भाषेच्या सक्तिविरोधात. निवडणुकांचं वातावरण दिसत आहे. आमच्या बाजूने जे काय महाराष्ट्राच्या मनात आहे ते आम्ही करु असे आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही राजकारण पाहत नाही आम्ही महाराष्ट्राच्या हित पाहतो असेही ठाकरे म्हणाले. बाकीच्या पक्षांबद्दल मी काय बोलू शकत नाही असेही ठाकरे म्हणाले. 

कांदिवली पूर्वेतील समतानगर येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शिव संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शाखा क्रमांक 25 च्या वतीने माजी नगरसेवक योगेश भोईर यांच्या माध्यमातून हा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. आमदार आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. या मेळाव्याला मोठ्यासंखेने पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

गृहखात काम करतय की नाही हा प्रश्न 

काही ना काही या राज्यात घडत चाललं आहे. गृहखात काम करतय की नाही हा प्रश्न असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. परवा चड्डी बनियन गॅंग मधील मुख्य मुक्केबाजावर काय कारवाई झाली? काल आमदार पैशाची बॅग घेऊन बसले काय कारवाई झाली?  असे सवाल आदित्य ठाकरेंनी केले. महाराष्ट्राच्या बाजूने आहे ते आम्ही करु बाकीच्या पक्षांबद्दल मी काही बोलू शकत नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले.  

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत. सरकार त्यांचं आहे त्यामुळं लाडकी बहिण योजना त्यांना बंद पाडायची आहे. ही योजना फसवी आहे. लोकांना फसवण्यासाठी भाजपाने ही योजना आणली असल्याचे ठाकरे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Bala Nandgaonkar : एकीकडे मनसे अन् शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची चर्चा; दुसरीकडे बाळा नांदगावकरांचं मोठं विधान, म्हणाले, आताही एकटे निवडणूक...

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीस सगळ्यात अपयशी गृहमंत्री, कायदा सुव्यवस्था कोसळून पडलीय, राष्ट्रपती राजवट हाच एकमेव पर्याय, संजय राऊतांचा हल्लाबोल 
देवेंद्र फडणवीस सगळ्यात अपयशी गृहमंत्री, कायदा सुव्यवस्था कोसळून पडलीय, राष्ट्रपती राजवट हाच एकमेव पर्याय, संजय राऊतांचा हल्लाबोल 
Tiger Shroff :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! जशास तसे उत्तर देऊ, हे करणाऱ्यांना ठेचून काढू : एकनाथ शिंदे
Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! जशास तसे उत्तर देऊ, हे करणाऱ्यांना ठेचून काढू : एकनाथ शिंदे
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget