Bala Nandgaonkar : एकीकडे मनसे अन् शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची चर्चा; दुसरीकडे बाळा नांदगावकरांचं मोठं विधान, म्हणाले, आताही एकटे निवडणूक...
Bala Nandgaonkar: आतापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटी निवडणूक लढवू, अशी सूचक प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकरांनी दिली आहे.

Bala Nandgaonkar on Shiv Sena UBT and MNS Yuti : राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांमध्ये मोठे फेरबदल झाल्याचं दिसून आलं आहे. अशातच तब्बल 20 वर्षांनतर मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी वेगळे झालेले दोन ठाकरे बंधु एकत्र आले आहेत. त्यामुळे आगामी काळात दोन राजकीय पक्ष एकत्र येत निवडणुका सोबत लढवतील अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. मात्र या सर्वामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज ठाकरेंचे (Raj Thackeray) अतिशय विश्वासू आशा बाळा नांदगावकरांनी युतीसंदर्भात मोठं विधान केलं आहे. आतापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटी निवडणूक लढवू, अशी सूचक प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकरांनी (Bala Nandgaonkar) दिली आहे.
शेवटी पक्ष वाढविण्यासाठी सर्व काम करतात- बाळा नांदगावकर
दरम्यान, शिवसेनेचं मुखपृष्ठ असणाऱ्या सामनाच्या रोखठोकमध्ये खळबळजनक दावा केला आहे. यावर बोलताना बाळा नांदगावकरांनी प्रतिक्रिया देत सांगितलं की मी अद्याप अग्रलेख वाचला नाही. तसेच युती होणार, की नाही होणार हे मला माहीत नाही. युती आणि आघाडी बद्दल साहेब बोलतील. शेवटी पक्ष वाढविण्यासाठी सर्व काम करत आहे. तसेच पक्षप्रमुख हे आमच्यापेक्षा 1000 फूट पुढे असतात. त्यांना पक्षाचे हित कशात आहे हे माहीत असते. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील असेही ते म्हणाले.
70-80 मतदारसंघ पॉझिटिव
एप्रिल महिन्यापासून मेळावा सुरू आहे. मुंबईतील आता 31वा मतदार संघ झाला. आज 33 मतदार संघ होतील. मी पूर्ण चाचपणी करत आहे की आपले मतदार किती आहे, ताकद कुठे जास्त, कुठे कमी आहे. माझ्याकडील 200 लोकांची टीम आहे. ती गटाध्यक्ष आणि शाखध्यक्ष यांच्यासोबत काम करत आहे. महिन्याआधी मी रिपोर्ट घेतला तेव्हा 70-80 मतदारसंघ पॉझिटिव आहे. अजून ए + आणि इतर चाचपणी सुरू आहे. असेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मनसे आणि उबाठा गट हे दोन पक्ष एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मुंबई नुकत्याच पार पडलेल्या मेळाव्यात ठाकरे बंधू (Thackeray Brothers) एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे राज ठाकरेंसमोर युतीसाठी हात समोर केला होता. यानंतर राज ठाकरे यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसला तरी ठाकरे गटाकडून मनसेशी (MNS) युती करण्यासाठी सर्वप्रकारची तयारी दाखवली जात आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेवर अंतिम निर्णय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे घेणार असले तरी या निर्णयाकडे सध्या राज्याचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा























