Buldhana News : टॅक्स भरण्यासाठी तब्बल 93 हजार चिल्लर आणली; खामगाव नगरपालिकेत कर्मचाऱ्यांची दमछाक
Buldhana News : मालमत्ता करधारक खामगाव नगरपालिकेत (Khamgaon Nagarpalika) कर (Tax) भरण्यासाठी पोहोचला, तेव्हा कर विभागात एकाच गोंधळ उडाला.
Buldhana News : मार्च अखेर प्रत्येक नगरपालिकेत पर्यंत कर वसुली सुरू आहे, आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मालमत्ता कर, नळपट्टी कर, आदी कर वसूल केला जातो, त्यासाठी नागरिक सुद्धा कर भरताना दिसत आहे, असाच मालमत्ता करधारक खामगाव नगरपालिकेत (Khamgaon Nagarpalika) कर भरण्यासाठी पोहोचला होता तेव्हा कर विभागात एकाच गोंधळ उडाला, काय कारण होते ?
तब्बल 93 हजार चिल्लर घेऊन करधारक नगरपालिकेत दाखल
खामगाव येथील जगदीश कल्याणदास बोहरा यांच्याकडे मालमत्ता कर 93 हजार 833 रुपये बाकी होता , तो कर भरण्यासाठी बोहरा यांनी 1, 2 व 5 रुपयांची नाणी असें 93 हजार 833 रुपयांची चिल्लर नाणी घेऊन नगरपालिकेत पोहोचले. तेव्हा एवढी चिल्लर पाहून कर्मचारी चकित झाले हे केव्हा मोजायचे असा प्रश्न पडला, आजच्या परिस्थितीत व्यवहारात काही नाणी घेतल्या जात नाहीत तेव्हा नागरपालिकेच्या कर्मचाऱयांनी फक्त 20 हजार रुपयांची नाणी स्वीकारली व बाकी रक्कम टप्या टप्प्याने भरण्याचे सुचविले.
पैसे मोजत मोजता अधिकारी घामाने चिंब
या घटनेवरून एका चित्रपटाची आठवण होते. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटातील एका दृश्याची प्रचिती खामगाव नगरपालिकेत आली. या चित्रपटात मकरंद अनासपुरे निवडणुकीसाठी २५ हजार रुपयांची अनामत रक्कम चिल्लर स्वरुपात भरायला घेऊन येतो आणि हे पैसे मोजत मोजता कर विभागातील अधिकारी अक्षरशः घामाने चिंब होतात. तोच फंडा एका चिप्स व्यावसायिकाने अंमलात आणला. मालमत्ता कर भरा असा तगादा लावल्याने त्यांनी 4 कॅरेटमधून 93 हजार 833 रुपयांची चिल्लर नगर पालिकेच्या कर विभागात आणली. यामुळे कर विभागात तारांबळ उडाली. अखेर तांत्रिक कारणास्तव 20 हजार रुपयांची चिल्लर स्वीकारून उरलेली रक्कम टप्याटप्प्याने भरण्याचे सांगण्यात आले.
संबंधित बातम्या :