एक्स्प्लोर

Sanjay Raut : सरकार दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल, संजय राऊतांचे फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर

काल विधानभवनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर सनसनाटी आरोप केले आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Sanjay Raut : विरोधीपक्ष नेत्याचं कामच असतं आरोप करण्याचं, त्यामुळे ते चर्चेत राहतात. आरोप करुन ते सनसनाटी निर्माण करतात. कालही त्यांनी असाच आरोप केला असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. दरम्यान, हे स्क्रिप्ट कोणी लिहिले आहे. यामध्ये कोण कोण सामील आहे, याच्या तळाशी सरकार नक्की जाईल आणि दुसरा पेनड्राइव्ह  घेऊन समोर येईल असे राऊत यावेळी म्हणाले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्य सरकारवर पेनड्राइव्ह बॉम्ब फोडला आहे. त्यांनी काल केलेल्या आरोपांना संजय राऊत यांनी आज प्रत्युत्तर दिले.  

गिरीष महाजनांविरोधात कुंभाड रचलं? असा आरोप विरोधी पक्षाकडून केला गेला. मात्र, महाराष्ट्र पोलीस असं कधी करत नाही. त्यांना चांगले प्रशिक्षण दिले जाते. राजकीय दबावाखाली ज्यांनी फोन टॅप केले त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जर कुंभाड रचायचे असेल तर सीबाआय आणि ईडीकडे जावं लागले असा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला. खोट्या कारवाया कशा कराव्यात, राजकीय नेत्यांना कसे अडकवावे, खोटे पुरावे कसे सादर करावेत हे सध्या केंद्रीय यंत्रणाचे काम सुरु आहे. महाराष्ट्र पोलिसांना त्यांच्याकडून प्रशिक्षण घ्यावे लागेल असे राऊत यावेळी म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशा प्रकारचे प्रशिक्षण घेण्याची परवानगी देणार नाहीत असे राऊत यावेळी म्हणाले. तसेच भाजपचे सलीम जावेद कोणं? असा सवालही यावेळी राऊत यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी सनसनाटी निर्माण करणारे आरोप केले आहेत. यामागे कोण आहे. हे स्क्रिप्ट कोणी लिहिले आहे. भाजपचे सलीम जावेद कोणं? असा सवालही राऊत यांनी केला. यामध्ये सामील कोण आहे, यातील पात्र कोण आहेत, याच्या खोलाशी सरकार नक्की जाईल आणि सरकार दुसरा पेनड्राइव्ह  घेऊन समोर येईल असे राऊत यावेळी म्हणाले.

विधानसभेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर पेनड्राइव्ह बॉम्ब फोडल्यानंतर आज बुधवारी विधीमंडळात सरकार कोणती भूमिका घेणार आहे, याकडे लक्ष लागले आहे. फडणवीसांच्या आरोपांवर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सभागृहात उत्तर देण्याची शक्यता आहे. राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा घणाघाती आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात खळबळ उडवून दिली. विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप असलेल्या व्हिडिओचा पेनड्राइव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला. 

महत्त्वाच्या बातम्या:

 

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवार हे महाराष्ट्राचे ‘अर्धवटराव’, त्यांची पीआर टीम त्यांना चालवते, विक्रम पाचपुतेंचा थेट हल्लाबोल 
रोहित पवार हे महाराष्ट्राचे ‘अर्धवटराव’, त्यांची पीआर टीम त्यांना चालवते, विक्रम पाचपुतेंचा थेट हल्लाबोल 
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
भिवंडीतील अर्जुनाळीत FDA ची मोठी कारवाई, तब्बल 2 कोटींचे खाद्यपदार्थ जप्त, कंपनीचा परवानाही केला निलंबित
भिवंडीतील अर्जुनाळीत FDA ची मोठी कारवाई, तब्बल 2 कोटींचे खाद्यपदार्थ जप्त, कंपनीचा परवानाही केला निलंबित
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित, नेमक्या काय उपाययोजना आणि सवलती? 
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित, नेमक्या काय उपाययोजना आणि सवलती? 

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Embed widget