एक्स्प्लोर

पेनड्राइव्ह बॉम्ब प्रकरण: विरोधी पक्षनेत्यांची विनंती गृहमंत्र्यांकडून मान्य, गुरुवारी सादर करणार निवेदन

Maharashtra Assembly Session : विरोधी पक्षनेते देवेद्र फडवणीस यांनी केलेल्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील गुरुवारी सभागृहात निवदेन सादर करणार आहेत.

Maharashtra Assembly Session: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केलेल्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील विधानसभेत गुरुवारी उत्तर देणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनुसार गुरुवारी उत्तर देणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. 

विधानसभेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर पेनड्राइव्ह बॉम्ब फोडल्यानंतर आज बुधवारी विधीमंडळात सरकार कोणती भूमिका घेणार आहे, याकडे लक्ष लागले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात उपस्थित राहणार नसल्याचे कळवले होते. त्यांच्या विनंतीनुसार गुरुवारी निवदेन सादर करणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. 

देवेंद्र फडणवीस यांचे आरोप काय?

राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा घणाघाती आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात खळबळ उडवून दिली. विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप असलेल्या व्हिडिओचा पेनड्राइव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला.

गिरीश महाजनांच्या विरोधात गुन्हा कसा नोंद करायचा यापासून ते बरंच काही या कार्यालयात ठरलं. एफआयआर नोंद करणे आणि खोटे साक्षीदार तयार करण्याचं काम सरकारी वकिलांनी केलं. साक्षी कशा घ्यायच्या त्यापासून पैसे कसे घ्यायचे याचा सर्व घटनाक्रम या व्हिडीओत असल्याचे त्यांनी म्हटले. 

काय आहे प्रकरण?

जळगावमधील निभोरा पोलीस ठाण्यात याबाबत प्रथम फिर्याद नोंदविण्यात आली होती. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त अॅड. विजय पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. मात्र कोथरूड परिसरात ही घटना घडल्यामुळे फिर्याद तिकडे वर्ग करण्यात आली. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार ट्रस्टची कागदपत्रे घेण्यासाठी तक्रारदाराला पुण्यात बोलविण्यात आले होते. मात्र तिथे त्यांना प्रथम एका हॉटेलमध्ये आणि नंतर एका फ्लॅटमध्ये नेण्यात आले. त्यानंतर काही लोकांनी, "गिरीशभाऊंना ट्रस्टवर ताबा हवा, म्हणून तुम्ही आता राजीनामा द्या", अशी धमकी दिल्याचं पोलीस तक्रारीमध्ये पाटील यांनी म्हटलेलं आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Budget Session: फडणवीसांनी वाचलेल्या भाषणातील शब्द अन् शब्द जशाच्या तसा; वाचा संपूर्ण भाषण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?
यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?
Muhurat Trading:मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टीवर काय घडलं? सर्वाधिक फायदा अन् फटका कुणाला? जाणून घ्या
मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी बाजाराची सकारात्मक सुरुवात, सेन्सेक्स अन् निफ्टीवर काय घडलं? 
Dattatray Bharane: मी जरी पक्ष सोडून गेलो तरी अजितदादांना काही फरक पडत नाही; नाराजांची समजूत काढणार, राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीबाबत भरणेंचा अप्रत्यक्ष इशारा
मी जरी पक्ष सोडून गेलो तरी अजितदादांना काही फरक पडत नाही; नाराजांची समजूत काढणार, राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीबाबत भरणेंचा अप्रत्यक्ष इशारा
Rajiv Deshmukh Passes Away: माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाळीसगावच्या राजकारणात मोठी पोकळी
माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाळीसगावच्या राजकारणात मोठी पोकळी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Virar Fire: विरार पूर्वमध्ये आगीचा भडका, फर्निचर दुकानासह अनेक दुकानं जळून खाक.
Bhendoli Utsav: 'आई राजा उदो उदो'च्या जयघोषात तुळजापुरात अग्नीचा थरारक 'भेंडोळी' उत्सव
Satara Diwali 2025 : कराडमध्ये मुस्लिम मुलांनी बालसुधारगृहातील मुलांना घातली दिवाळीची अंघोळ
Festive Decor : जेजुरीच्या Khandoba मंदिरात फुलांची आकर्षक आरास, भाविकांची गर्दी
Diwali 2025 : लक्ष्मीपूजनाचा दिवस, Nashik च्या काळाराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?
यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?
Muhurat Trading:मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टीवर काय घडलं? सर्वाधिक फायदा अन् फटका कुणाला? जाणून घ्या
मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी बाजाराची सकारात्मक सुरुवात, सेन्सेक्स अन् निफ्टीवर काय घडलं? 
Dattatray Bharane: मी जरी पक्ष सोडून गेलो तरी अजितदादांना काही फरक पडत नाही; नाराजांची समजूत काढणार, राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीबाबत भरणेंचा अप्रत्यक्ष इशारा
मी जरी पक्ष सोडून गेलो तरी अजितदादांना काही फरक पडत नाही; नाराजांची समजूत काढणार, राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीबाबत भरणेंचा अप्रत्यक्ष इशारा
Rajiv Deshmukh Passes Away: माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाळीसगावच्या राजकारणात मोठी पोकळी
माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाळीसगावच्या राजकारणात मोठी पोकळी
BCCI : आशिया कपची ट्रॉफी भारताला द्या, बीसीसीआयचा मोहसीन नक्वीला इशारा, मागणी मान्य न केल्यास पुढचं पाऊल टाकणार 
मोहसीन नक्वीला आशिया कपची ट्रॉफी भारताला द्यावीच लागणार, बीसीसीआयचा कडक मेसेज,आता टाळाटाळ महागात पडणार
Pro Kabaddi U Mumba player Death: यू मुम्बाच्या 'या' खेळाडूचे अचानक निधन, प्रो कबड्डीच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला
यू मुम्बाच्या 'या' खेळाडूचे अचानक निधन, प्रो कबड्डीच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला
Nashik Crime: गुन्हेगारांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा रिक्षा चालकांकडे; तब्बल 60 बेशिस्त चालकांना 'खाकी'चा दणका!
गुन्हेगारांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा रिक्षा चालकांकडे; तब्बल 60 बेशिस्त चालकांना 'खाकी'चा दणका!
Raigad Crime News: फेसबुक मित्राने केला घात, शरीरसंबंध ठेवत विवाहितेला जाळ्यात अडकवलं, अडीच वर्षे दिल्या नरकयातना, घटनेनं रायगड हादरलं
फेसबुक मित्राने केला घात, शरीरसंबंध ठेवत विवाहितेला जाळ्यात अडकवलं, अडीच वर्षे दिल्या नरकयातना, घटनेनं रायगड हादरलं
Embed widget