एक्स्प्लोर

LIVE : उरणमधील सर्च ऑपरेशन संपल्याचं नौदलाकडून जाहीर

रायगड: उरण शहरात 4 संशयित तरुण घुसल्याची माहिती मिळत आहे. या संशयितांकडे बंदुका असल्याचं सांगण्यात येत आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी बंदुकधाऱ्यांना पाहिल्याची माहितीही देण्यात येत आहे. सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क, नागरिकांनी घाबरु नये, पोलिसांनी माहिती द्यावी, अफवांवर विश्वास ठेवू नका, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचं आवाहन UPDATE : सर्च ऑपरेशन संपल्याचं नौदलाकडून जाहीर, मात्र स्थानिक पोलिसांकडून तपास सुरुच UPDATE : मुंबई पोलिसांकडून उरणमधील दुसऱ्या संशयिताचं रेखाचित्र जारी LIVE : उरणमधील सर्च ऑपरेशन संपल्याचं नौदलाकडून जाहीर UPDATE : मुंबई पोलिसांकडून उरणमधील संशयिताचं रेखाचित्र जारी a687866a-10b9-45a5-ab30-e33a759c254e UPDATE : उरणसंदर्भात सर्व अहवाल उद्यापर्यंत सादर करा, गृहविभागाच्या अति. मुख्य सचिवांकडून पोलिस महासंचालकांना आदेश UPDATE : पोलिस, नौदलासह NSG, IB, ATS कडूनही शोधमोहिम सुरु, मुंबई, नवी मुंबईत हायअलर्ट UPDATE : उरण अपडेट : एनएसजीच्या टीमकडूनही शोधकार्य सुरु, आयबीची टीमही उरणमध्ये दाखल, शोधकार्य सुरुच राहणार उरणमध्ये क्यूआरटी, क्राईम ब्रान्च, नौदल, पोलिस, कोस्टल पोलिस सीआयएसएफची तुकडी यांचं एकत्रित सर्च ऑपरेशन सुरु आहे. काळे कपडे घालून आलेल्या संशयितांकडे शस्त्र असल्याची माहिती शाळकरी मुलांनी दिली. उरण हा अतिसंवेदनशील भाग असल्याने मुलांच्या माहितीवर सर्च ऑपरेशन सुरु आहे. LIVE : उरणमधील सर्च ऑपरेशन संपल्याचं नौदलाकडून जाहीर दक्षिण मुंबई, नवी मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणी नाकाबंदी केली असून पोलिस स्टेशनला अलर्ट देण्यात आला आहे. संवेदनशील उरण का महत्त्वाचं? Uran महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातला एक महत्त्वाचा तालुका म्हणजे उरण. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर उरण वसल्याने या तालुक्याला वेगळं महत्त्व आहे. आगरी आणि कोळी समाज मोठ्या प्रमाणावर असलेल्या या तालुक्यात मासेमारी आणि भात शेती प्रमुख व्यवसाय आहे. भारतातील सर्वात मोठं बंदर म्हणजे जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (JNPT) उरणमध्ये आहे. शिवाय, नौदलाचं तळही उरणमधील मोराजवळ आहे. ऑईल अँड नॅचरल गॅसचं (ONGC) प्लांटही उरणमध्ये असून, GTPS-MSEB चा आशियातील पहिला नैसर्गिक गॅस प्रकल्प उरणमध्येच आहे. पर्यटनाच्या दृष्टीने पिरवाडी बीचही आहे, जिथे कायम पर्यटकांची वर्दळ असते. शिवाय, दिघोडे गावाजवळ रणसई धरणावरही पर्यटकांची गर्दी असते. -------------- रायगड: उरण शहरात 4 संशयित तरुण घुसल्याची माहिती मिळत आहे. या संशयितांकडे बंदुका असल्याचं सांगण्यात येत आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी बंदुकधाऱ्यांना पाहिल्याची माहितीही देण्यात येत आहे. नवी मुंबई पोलिसांना त्याबाबतचे फोन आल्यानंतर इथे सकाळपासून तपास सुरु करण्यात आला आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. LIVE : उरणमधील सर्च ऑपरेशन संपल्याचं नौदलाकडून जाहीर पोलीस आणि नेव्हीच्या पथकांनी या परिसरात शोधमोहीम सुरु केली आहे. नेव्हीची मार्कोस टीम शाळेत हजर झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. इकडे मुंबई पोलिसांनाही खबरदारी घेतली आहे. मुंबई पोलिसांनी फोन नंबर जारी करुन, संशयित दिसल्यास तातडीने कळवण्याचं आवाहन केलं आहे. दुसरीकडे कुलाबा पोलिसांनीही नागरिकांसाठी संदेश जारी केला आहे. "सर्व सागर रक्षक / आईज ॲण्डा ईअर  सदस्य, मच्छीमार बांधव व सर्व पोलीस मित्र  यांना सूचित करण्यात येते की, चार इसम ज्यांनी भारतीय सैनिकांसारखी वेशभूषा केलेली आहे. असे इसम उरण व करंज्या परिसरात  संशयितरित्या फिरताना दिसलेले आहेत. तरी सागरी सुरक्षेच्या दृष्टिने असे  व्यक्ति  समुद्रा मागे कुलाबा परीसरात  येण्याची शक्यता आहे तसेच काही संशय वाटल्यास तात्काळ कुलाबा  पोलिस ठाणेस माहिती दया", असं आवाहन कुलाबा पोलिसांनी केलं आहे. सर्व सुरक्षा व्यवस्था सतर्क दरम्यान, या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था सतर्क असल्याचं राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंच्या विरोधात बोलतो म्हणून मला मारहाण; अमोल खुणे मारहाप्रकरणी 6 अज्ञातांवर गुन्हा; आरोप फरार, पोलीस पथके रवाना
मनोज जरांगेंच्या विरोधात बोलतो म्हणून मला मारहाण; अमोल खुणे मारहाप्रकरणी 6 अज्ञातांवर गुन्हा; आरोप फरार, पोलीस पथके रवाना
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
Embed widget