एक्स्प्लोर
Advertisement
जिल्हा मुख्यालयाच्या कामासाठी ठाण्याहून 30 कामगार पालघरमध्ये, ठेकेदारावर गुन्हा दाखल
ठाण्याहून 30 कामगार विना परवानगी पालघरमध्ये दाखल झाले आहेत. हे कामगार पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामासाठी आले आहेत, अशी माहिती आहे. याप्रकरणी या कामगारांना आणणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघर : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्यात सध्या लॉकडाऊन आहे. या दरम्यान कुणालाही एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास मज्जाव आहे. तरीही अनेकांना कोरोनाचं गांभीर्य अद्याप कळालेलं नाही. ठाण्याहून 30 कामगार विना परवानगी पालघरमध्ये दाखल झाले आहेत. हे कामगार पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामासाठी आले आहेत, अशी माहिती आहे. याप्रकरणी या कामगारांना आणणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघर जिल्हा हा ‘रेड झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र, असं असतानाही कोणतीही परवानगी न घेता ठाणे जिल्ह्यातून बसमधून 30 कामगार पालघरमध्ये दाखल झाले. पालघर येथील कोळ गाव परिसरात जिल्हा मुख्यालयाच्या कामासाठी डेकोर होम इंडिया प्रायव्हेट लिमटेड ह्या एजन्सीद्वारे 30 कामगार आणले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला
जिल्हा बंदी असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला धुडकावून हे कामगार पालघरमध्ये आणले गेले. या कामगारांना आणल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे पालघर मुख्यालय परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या ठाण्यातून हे कामगार आल्याने पालघरमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा चुकीचा वापर करुन कामगार वाहतूक करणाऱ्या ठेकेदारावर पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या कामगारांना आणणारी बसही ताब्यात घेण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement