एक्स्प्लोर

ममता कुलकर्णी ड्रग्ज रॅकेटमध्ये, ठाणे पोलिसांकडून शिक्कामोर्तब !

ठाणे: 2 हजार कोटी रुपयांच्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या विरोधात सबळ पुरावे ठाणे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे तिलाही याप्रकरणी आरोपी करण्यात आलं आहे. लवकरच ममता कुलकर्णीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात येणार असल्याची माहिती, ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली.   12 एप्रिलला 2 हजार कोटी रूपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं.  8 जानेवारीला या ड्रग्ज तस्करीची बैठक केनियामध्ये झाली होती. त्या बैठकीला ममता कुलकर्णी उपस्थित होती.  2 साक्षीदारांनी ममता कुलकर्णीच्या विरोधात साक्ष दिली आहे. त्यामुळे सर्व पुरावे बघता ममता कुलकर्णीला आरोपी घोषीत करण्यात आलं आहे.   ममतासोबतच तिचा पती विक्की गोस्वामी,ड्रग्ज जगतातलं कुख्यात नाव असलेला अब्दुल्ला, आणि अन्य 7 वॉन्टेड आरोपी असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.   ड्रग्ज बनवणाऱ्या कंपनीत एकूण 2 कोटी शेअर्सपैकी 11 लाख शेअर्स ममताच्या नावावर केले जाणार होते.  या कंपनीचं जाळं साऊथ अफ्रिका, कोलंबिया, अमेरिका आणि भारतात पसरल्याचं सिंह यांनी सांगितलं.   काय आहे संपूर्ण प्रकरण? एप्रिल आणि मे महिन्यात ठाणे पोलिसांनी 2000 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णीचा पती विकी गोस्वामीचं नाव समोर आलं होतं. विकी गोस्वामी सध्या केनियामध्ये आहे.

सोलापुरातील 2200 कोटींचं ड्रग्ज साठा प्रकरण: मास्टरमाईंड अखेर गजाआड

  कल्याणमध्ये 12 एप्रिल रोजी पहिल्यांदा एका नायजेरियन ड्रग डिलरला अटक करण्यात आली होती. नायजेरियन डिलरच्या माहितीनुसार, ठाण्यातून  2 तरुणांना अटक करण्यात आली. या दोन्ही तरुणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुण्यातून मयूर स्वामी नावाच्या फॅक्टरी मॅनेजरच्या मुसक्या आवळल्या. या सगळ्यांच्या माहितीनंतर सोलापूरच्या एव्हॉन लाईफ सायन्स ऑरगॅनिक कंपनीवर छापा मारण्यात आला. या कंपनीतून 2000 कोटी रुपये किंमतीचं एफिड्रिन ड्रग्ज सापडलं.   या रॅकेटमध्ये आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. अजूनही अनेक आरोपी फरार असून याचा मास्टरमाईंड ममता कुलकर्णीचा पती आणि आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट किंग विकी गोस्वामी आहे. आता ममता कुलकर्णीविरोधातही पोलिसांना महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत.  

संबंधित बातम्या

एफिड्रिन ड्रग प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या नवऱ्याचं नाव सोलापुरातील 2200 कोटींचं ड्रग्ज साठा प्रकरण: मास्टरमाईंड अखेर गजाआड ठाणे इफेड्रीन ड्रगप्रकरणात माजी आमदाराचा मुलगा? 18 टन, 2 हजार कोटींचं एफेड्रिन ड्रग्ज जप्त सोलापुरात 200 कोटींचं एफिड्रिन ड्रग जप्त 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget