एक्स्प्लोर
Advertisement
रायगडच्या सुधागड पालीत सुमारे सव्वादोन कोटींच्या जुन्या नोटा जप्त
रायगड: आठ महिन्यांपूर्वी झालेल्या नोटबंदीनंतर बुधवारी रात्री रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली येथे सुमारे सव्वादोन कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यासंबंधी 8 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
काही व्यक्ती जुन्या नोटा घेऊन पाली परिसरात येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पाली पोलीसांनी खुरावले फाटा येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. यावेळी एका कारमध्ये तब्बल सव्वादोन कोटीच्या जुन्या नोटा सापडल्या. यावेळी 6 प्रवासी आणि दोन चालकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. दोन कार देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
दरम्यान, ही रक्कम नेमकी कुठे नेण्यात येणार होती. याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. तसेच या मागचा नेमका सुत्रधार कोण? याचाही पोलीस तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
राजकारण
राजकारण
Advertisement