एक्स्प्लोर

मैत्रिणीच्या सांत्वनासाठी गेल्या अन् क्वॉरंटाईन झाल्या; कोल्हापूरच्या करवीरमधील घटना

कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यातील कांचनवाडीमध्ये 19 महिलांना क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. या सर्व महिला आपल्या मैत्रिणीचं सांत्वन करण्यासाठी गेल्या होत्या.

कोल्हापूर : ग्रामीण भागात आज देखील कुणाच्या घरी दुःखद घटना घडली की, सांत्वनासाठी जाण्याची परंपरा आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात मैत्रिणीच्या सांत्वनासाठी गेलेल्या 19 महिलांना क्वॉरंटाईन होण्याची वेळ आली आहे. ही घटना करवीर तालुक्यातील कांचनवाडी या ठिकाणी घडली आहे. आपल्या मैत्रिणीच्या पतीचं निधन झाल्यानंतर 19 महिला चाफोडी याठिकाणी सांत्वनासाठी गेल्या होत्या. मात्र ज्या मैत्रिणीचे सांत्वन करण्यासाठी गेल्या त्या महिलेलाच कोरोना झाल्याचं समोर आलं. त्यानंतर कांचनवाडी गावात एकच खळबळ उडाली. चार दिवसांपूर्वी संबधित महिलेच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर कांचनवाडीतील महिला सांत्वनासाठी गेल्या, मात्र ज्या महिलेचं सांत्वन केले त्या महिलेचाच अहवाल आता पॉझिटिव्ह आला आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या चाफोडी येथील महिला कांचनवाडी इथल्या महिलांसोबक असायची. छोट्या-मोठ्या कामाबरोबर शेतीच्या कामानिमित्त या महिलांचा चांगला ग्रुप तयार झाला होता. एकमेकींच्या दुःखात या सहभागी होत असतं. मात्र कोरोनामुळे सध्याची परिस्थिती वेगळी आहे. असं असताना देखील या महिला मैत्रिणीचे सांत्वन करण्यासाठी तिच्या घरी गेल्या. पण ज्या मैत्रिणीच्या सांत्वनासाठी गेल्या ती मैत्रिणच कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने या सर्व महिलांना क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. अशातच क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या महिलांपैकी एका महिलेला धाप लागण्यास सुरुवात झाल्यामुळे इतर महिलांही घाबरून गेल्या आहेत.

सदर घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सांत्वनासाठी गेलेल्या सर्व महिलांना आरोग्य विभागाने विलगीकरण कक्षात ठेवले आहे. गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र शहराबाहेर, तसेच ग्रामीण भागातही नागरिक नियम धाब्यावर बसवत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कोल्हापूर् जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा हजारांच्या पार पोहोचला आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, तसेच तोंडाला मास्क वापरा, अशा सुचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. परंतु, यासर्व सुचनांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

अंत्यसंस्कार किंवा रक्षाविसर्जन याला उपस्थिती लावणे हे परंपरा समजली जाते. रूढी-परंपरा पाळा पण कोरोनाच्या संकटात हे आपल्याला शक्य नाही. शासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. त्यामुळे नागरिकांनी फोनवरून सांत्वन करणं योग्य ठरेल. सामाजिक भान ठेवून प्रतिष्ठित नागरिकांनी गर्दी टाळावी अशी विनंती शिरोली दुमाला येथील बैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा मोरे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Coronavirus | कर्नाटकात दहावीची परीक्षा दिलेले 32 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

बीडमध्ये कोर्टाच्या आवारातच वकिलांचं बर्थडे सेलिब्रेशन करत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, 11 वकीलांवर गुन्हे दाखल

कोरोनाचा राजकारण्यांनाही धसका, मंत्र्यांसह काही आमदार, महापौरांना लागणFil

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Who is Hassan Nasrallah : 80 टनाच्या बाॅम्बने खात्मा; कोण होता नसराल्लाह? इस्रायलशी 50 वर्षे शत्रुत्व, भाजी विक्रेत्याच्या घरात जन्म, वयाच्या 15व्या वर्षी ज्यूंविरुद्ध उचलले शस्त्र
80 टनाच्या बाॅम्बने खात्मा; कोण होता नसराल्लाह? इस्रायलशी 50 वर्षे शत्रुत्व, भाजी विक्रेत्याच्या घरात जन्म, वयाच्या 15व्या वर्षी ज्यूंविरुद्ध उचलले शस्त्र
Pune Metro: पुण्यातील भूमिगत मेट्रोचं मोदींकडून लोकार्पण! तिकीट काय असणार; जाणून घ्या सामान्यांना प्रवास परवडणार का?
पुण्यातील भूमिगत मेट्रोचं मोदींकडून लोकार्पण! तिकीट काय असणार; जाणून घ्या सामान्यांना प्रवास परवडणार का?
Devendra Fadnavis: 'काहींनी छात्या बडवल्या', मेट्रोचं लोकार्पण लांबल्याने मविआने केलेल्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, 'आधी एक पिलर...'
'काहींनी छात्या बडवल्या', मेट्रोचं लोकार्पण लांबल्याने मविआने केलेल्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, 'आधी एक पिलर...'
Shiv Sena Dasara Melava : दसरा मेळाव्याच्या जागेचा वाद टळला? शिंदेंचा मेळावा 'या' मैदानावर होण्याची शक्यता, ठाकरेंची तोफ शिवाजी पार्कवरच धडाडणार?
दसरा मेळाव्याच्या जागेचा वाद टळला? शिंदेंचा मेळावा 'या' मैदानावर होण्याची शक्यता, ठाकरेंची तोफ शिवाजी पार्कवरच धडाडणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Pune : पावसामुळे पुणेकरांची अडचण होऊ नये म्हणून पंतप्रधानांनी कार्यक्रम रद्द केला-पवारHingoli : संतोष बांगर यांच्या पुढाकारातून परडी मोड येथे विपश्यना केंद्राचे भूमिपूजनMumbai Accident : कल्याण-पत्री पुलावर 106 चाकांचा ट्रेलर उलटल्यानं वाहतूक कोंडीIndapur:आयात उमेदवाराला संधी देऊ नका, इंदापुरातील कार्यकर्त्यांची पवारांकडे मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who is Hassan Nasrallah : 80 टनाच्या बाॅम्बने खात्मा; कोण होता नसराल्लाह? इस्रायलशी 50 वर्षे शत्रुत्व, भाजी विक्रेत्याच्या घरात जन्म, वयाच्या 15व्या वर्षी ज्यूंविरुद्ध उचलले शस्त्र
80 टनाच्या बाॅम्बने खात्मा; कोण होता नसराल्लाह? इस्रायलशी 50 वर्षे शत्रुत्व, भाजी विक्रेत्याच्या घरात जन्म, वयाच्या 15व्या वर्षी ज्यूंविरुद्ध उचलले शस्त्र
Pune Metro: पुण्यातील भूमिगत मेट्रोचं मोदींकडून लोकार्पण! तिकीट काय असणार; जाणून घ्या सामान्यांना प्रवास परवडणार का?
पुण्यातील भूमिगत मेट्रोचं मोदींकडून लोकार्पण! तिकीट काय असणार; जाणून घ्या सामान्यांना प्रवास परवडणार का?
Devendra Fadnavis: 'काहींनी छात्या बडवल्या', मेट्रोचं लोकार्पण लांबल्याने मविआने केलेल्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, 'आधी एक पिलर...'
'काहींनी छात्या बडवल्या', मेट्रोचं लोकार्पण लांबल्याने मविआने केलेल्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, 'आधी एक पिलर...'
Shiv Sena Dasara Melava : दसरा मेळाव्याच्या जागेचा वाद टळला? शिंदेंचा मेळावा 'या' मैदानावर होण्याची शक्यता, ठाकरेंची तोफ शिवाजी पार्कवरच धडाडणार?
दसरा मेळाव्याच्या जागेचा वाद टळला? शिंदेंचा मेळावा 'या' मैदानावर होण्याची शक्यता, ठाकरेंची तोफ शिवाजी पार्कवरच धडाडणार?
Madhya Pradesh : उभ्या असलेल्या डंपरमध्ये खासगी बस घुसल्याने 9 जणांचा जागीच अंत; जेसीबी, गॅस कटरने बस कापून प्रवाशांना बाहेर काढले
उभ्या असलेल्या डंपरमध्ये खासगी बस घुसल्याने 9 जणांचा जागीच अंत; जेसीबी, गॅस कटरने बस कापून प्रवाशांना बाहेर काढले
Sanjay Raut : मेट्रोचं 6 वेळा उद्घाटन करणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान; पुण्यातील मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यावरुन संजय राऊतांची टीका
मेट्रोचं 6 वेळा उद्घाटन करणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान; पुण्यातील मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यावरुन संजय राऊतांची टीका
बदलापूरच्या 'त्या' शाळेतील मुलगी घर सोडून छत्रपती संभाजीनगर शहरात, सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून...
बदलापूरच्या 'त्या' शाळेतील मुलगी घर सोडून छत्रपती संभाजीनगर शहरात, सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून...
Sharad Pawar: हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा विरोध; आयात उमेदवार नको म्हणत केला विरोध, शरद पवासांसमोर मोठा पेच?
हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा विरोध; आयात उमेदवार नको म्हणत केला विरोध, शरद पवासांसमोर मोठा पेच?
Embed widget