एक्स्प्लोर
पालघरमधील तब्बल 123 शाळा बंद, जिल्हा परिषदेचा निर्णय
पालघर जिल्हा परिषदेने 123 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या 123 शाळांमधील 2 हजार 442 विद्यार्थ्यांना आता आपापल्या गावांच्या शेजारील गावातील शाळेत शिकायला जावं लागणार आहे.
पालघर : पालघर जिल्हा परिषदेने 123 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या 123 शाळांमधील 2 हजार 442 विद्यार्थ्यांना आता आपापल्या गावांच्या शेजारील गावातील शाळेत शिकायला जावं लागणार आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या निर्णयाचा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. जिल्हापरिषदेच्या या निर्णयाला आता पालकांकडून विरोध होऊ लागला आहे.
ज्या शाळांमध्येत 30 पेक्षा कमी पटसंख्या आणि एक किलो मीटरच्या आतील शाळा बंद करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले यांनी दिली.
एवढ्या मोठ्या संख्येने शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे लाखो रुपये खर्च करुन उभारलेल्या 123 शाळा ओस पडणार आहेत. शासनाने कोट्यावधी रुपये खर्च केलेला निधी वाया जाणार आहे. तर प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांना ये-जा करण्यास मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. शिवाय, ग्रामीण भाग असल्याने विद्यार्थी तसेच पालकांना अडचणींना सामोरे जाव लागणार असल्याने पालकांकडून या समायोजनाला विरोध होऊ लागला आहे.
ग्रामीण भागातील आदिवासी जनता शिक्षणाकडे वळावी, यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. कोट्यावधी रुपये खर्चही करत आहे. मात्र आता याच 123 शाळा बंद केल्याने पहिली ते चौथीपर्यंत शिकणारे लहान विद्यार्थी शेजारील गावातील शाळेत हजेरी लावतीलच, हे सांगणं कठीण आहे. कारण मुलांना येण्या-जाण्यास मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement