एक्स्प्लोर
राज्यातील 1151 ग्रामपंचायतींच्या भवितव्याचा आज फैसला

मुंबई: राज्यातील 1151 ग्रामपंचायती आणि सहा नगरपंचायतींचं भवितव्य आज ठरणार आहे. काल मोठ्या उत्साहात मतदान पार पडल्यानंतर आज या ग्रामपंचायती आणि नगरपंचायतींचा निकाल जाहीर होणार आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यातील ग्रामपंचायती आणि नगरपंचायती तसेच विविध महापालिका आणि काही जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी काल मतदान घेण्यात आलं. ज्यामध्ये ग्रामपंचायतींसाठी 75 टक्के तर नगरपंचायतींसाठी 78 टक्के मतदानाची नोंद झाली. दरम्यान, नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 6च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या संध्या यादव विजयी झाल्या आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















