एक्स्प्लोर

10 November In History : छत्रपतींच्या पराक्रमाची गाथा! अफजलखानाचा वध, जागितक विज्ञान दिन; आज इतिहासात

On This Day In History : आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगड येथे अफजल खानाचा वध केला. तर आजच्याच दिवशी जागतिक विज्ञान दिन साजरा केला जातो.

मुंबई : देशात आणि जगभरात अनेक अशा घटना घडतात ज्यांची नंतरच्या काळात इतिहासात नोंद घेतली जाते. आजचा दिवस जागितक विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सामान्य जनमानसात विज्ञानाबद्दल जागृती वाढावी, विज्ञानाचा शांततेसाठी आणि विकासासाठी वापर व्हावा यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. चंद्रशेखर यांनी भारताचे आठवे पंतप्रधान म्हणून आजच्या (10 नोव्हेंबर) दिवशी शपथ घेतली होती. तर बिल गेट्स यांनी विंडोज 1.0 प्रकाशित केले होते. आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत, याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 

1659 : अफझल खानाचा वध

आजच्या दिवशी 1659 मध्ये शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाचा वध केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना रोखण्यासाठी विजापूरचा राजा आदिलशाने अफझल खानाला पाठवलं होतं. अफझलखानाने वाईकडे येताना वाटेत येणारे गाव आणि  मंदिरे उद्ध्वस्त केली होती. अफझल खानाने शिवाजी महाजारांना भेटायला बोलवलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज मी आपल्याला घाबरलो आहे, मी तिथे येत नाही आपणच प्रतापगडाला या, असा निरोप धाडला होता. अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याशी पोहोचला. तिथे त्यांच्या भेटण्याची व्यवस्था करण्यात आली होती. भेटीसाठी कोणतेही हत्यार कोणाकडे नसतील. तसेच दोन्ही पक्षाचे 10 अंगरक्षकअसतील त्या अंगरक्षकांपैकी एक शामियानाच्या बाहेर थांबेल, अशी अट ठरली होती. पण शिवाजी महारांजाना त्याच्या घातपाती स्वभावाची जाणीव होती. त्यामुळे शिवाजी महाराज सोबत वाघनखे घेऊन गेले होते. अफझल खानाने धोक्यानं शिवाजी महाराजांच्या पाठित वार केला. चिलखत घातल्यामुळं अफझल खानाचा वार फसला, त्याच क्षणी शिवाजी महाराजांनी वाघनख्यांनी त्याचा कोथळा बाहेर काढला. त्यावेळी अफझल खान ’दगा ऽऽऽ दगा ऽऽऽ …’ असे ओरडला.

1928 : जागितक विज्ञान दिवस (World Science Day)

10 नोव्हेंबर हा दिवस जगभरात जागतिक विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.  सयुंक्त राष्ट्र संघाने 2002 मध्ये हा दिवस 'जागतिक विज्ञान दिवस' म्हणून घोषित केला होता. सामान्य जनमानसात विज्ञानाबद्दल जागृती वाढावी, विज्ञानाचा शांततेसाठी आणि विकासासाठी वापर व्हावा यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. दरम्यान, भारतामध्ये 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून सारजा केला जातो.  प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. सिव्ही रमन यांनी आपले शोध 1928 जगापुढे मांडले होते. म्हणून त्या निमित्ताने 28 फेब्रुवारीला भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.

1983 : बिल गेट्स यांनी विंडोज 1.0 प्रकाशित केले

1983 मध्ये आजच्याच दिवशी बिल गेट्स यांनी न्यूयॉर्कमध्ये विंडोज 1.0 प्रकाशित केले होते. मायक्रोसॉफ्टच्या विंडोज 1.0 ने संगणकाचा अंदज बदलला. जगभरात आज 77 टक्केंपेक्षा जास्त मोबाइल आणि लॅपटॉप विंडोजवर चालतात, याच क्रांतीला 1983 मध्ये सुरुवात झाली होती. 

1990 : चंद्रशेखर भारताचे आठवे पंतप्रधान

चंद्रशेखर यांनी 10 नोव्हेंबर 1990 रोजी भारताचे आठवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांचा कार्यकाळ 21 जून 1991 पर्यंत होता. जनता दलाच्या तुटलेल्या अल्पसंख्यांक सरकारचे चंद्रशेखर यांनी नेतृत्व केले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून मिळालेल्या बाहेरील पाठिंब्यामुळे त्यांनी सरकार स्थापन केले होते. 

इतर महत्त्वाच्या घडामोडी 

1785 : हॉलँड आणि फ्रान्स यांनी करारावर स्वाक्षरी केली
1793 : फ्रान्समध्ये जबरदस्तीने देवाची पूजा करण्याचा नियम संपला.
1847 : आयरलँडच्या दक्षिण समुद्रकिनाऱ्यावर  स्टीफन व्हिटनी जहाजाचा अपघात झाला, यामध्ये 92 जणांचा मृत्यू  
1938 : अमेरिकेच्या लेखिका पर्ल बक यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर
1950 : अमेरिकातील लेखक विलियम फॉकनर यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार
1958 : गुजरातमदील बडोद्याजवळ प्रायोगिक विहिरीत तेल सापडले
1960 : विदर्भ चळवळीच्या आदेशावरुन नागपुरात हरताळ, व्यापाऱ्यांनी बंद पुकारले... दुकानं हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
1978 : रोहिणी खांडिलकर राष्ट्रीय चेस चॅम्पियनशिप जिंकणार्या पहिल्या महिला ठरल्या.  
1983 : बिल गेट्स यांनी विंडोज 1.0 प्रकाशित केले
1986 : बांगलादेशात 4 वर्षानंतर संवैधानिक सरकार स्थापन झाले
1989 : जर्मनीमध्ये बर्लिनची भींत पाडण्याच्या कामाला सुरुवात 
1990 : चंद्रशेखर राव यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 
1991 - जागतिक कॅरम चॅम्पियनशिपमध्य भारतीय संघाचा विजय  
1997 - चीन-रशिया यांच्यातील सीमावाद संपला.  
2001 - भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेला संबोधित केलं. 
2005 - अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जार्ज बुश यांनी दलाई लामा यांच्याशी चर्चा केली. 
2005 - जार्डन येथे तीन हॉटेलमध्ये विस्फोट, 57 जणांचा मृत्यू  
2006 - श्रीलंकाचे तामिळ नेते नाडाराजाह रविराज यांची कोलंबोमध्ये हत्या करण्यात आली.  
2008 -  ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने बॉर्डर-गावसकर चषकावर नाव कोरलं. 
2014: सुप्रीम कोर्टने चित्रपट इंडस्ट्रीमध्ये महिलांना मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करण्यावरील निर्बंध हटवले.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Fact Check: भाजप नेत्यांकडून आपच्या अवध ओझांचा सिसोदियांना 'घाबरट' म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल, दावा ठरला खोटा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
आपचे नेते अवध ओझांनी मनीष सिसोदियांना घाबरट म्हटल्याच्या दावा खोटा, एडिटेड व्हिडीओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर | Superfast News | 17 January 2025ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 03 PM 17 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सSaif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Fact Check: भाजप नेत्यांकडून आपच्या अवध ओझांचा सिसोदियांना 'घाबरट' म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल, दावा ठरला खोटा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
आपचे नेते अवध ओझांनी मनीष सिसोदियांना घाबरट म्हटल्याच्या दावा खोटा, एडिटेड व्हिडीओ व्हायरल
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Embed widget