Maro Dev Bapu Sevalal Song : 'मिसेस मुख्यमंत्र्यांचं' नवं गाणं प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या 'मारो देव बापू सेवालाल'वर कौतुकाचा वर्षाव
Amruta Fadnavis Song : अमृता फडणवीस यांचं 'मारो देव बापू सेवालाल' रिलीज झालं असून त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Devendra Fadnavis Wife Amruta Fadnavis Song : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. अमृता फडणवीस यांचं 'मारो देव बापू सेवालाल' हे नवं मराठी गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. टी-सीरिजच्या बॅनरखाली हे नवं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. अमृता फडणवीस यांचं गाणं रिलीज होताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra CM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) बँकर असण्यासोबतच गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असतात आणि त्याच्या आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता अमृत फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. टी-सीरीजने त्यांच्या अधिकृत यु-ट्युब चॅनलवर अमृता फडणवीस यांचं 'मारो देव बापू सेवालाल' (Maro Dev Bapu Sevalal Song) रिलीज केलं आहे.
View this post on Instagram
'मारो देव बापू सेवालाल' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
अमृता फडणवीस यांच्या 'मारो देव बापू सेवालाल' या गाण्याचे गीतकार निलेश जालमकर आहेत, तर याचं संगीत दिग्दर्शन कामोद सुभाष यांनी केलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये अमृता फडणवीस बंजारा लूकमध्ये दिसत आहेत.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :























