एक्स्प्लोर

Delhi Assembly Election Results 2025: दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पराभवाच्या छायेत? भाजपची मुसंडी, 27 वर्षांनी दिल्ली काबीज करणार?

Delhi Assembly Election Results 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एकूण 70 जागांवर कोण बाजी मारणार, याबद्दल राजकीय वर्तुळाला उत्कंठा आहे. यापूर्वी 2013, 2015 आणि 2020 या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये ‘आप’ने सहज विजय मिळवला होता.

नवी दिल्ली: संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर होत आहे. दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. आज सकाळी आठ वाजता पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी सुरु करण्यात आली. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून दिल्लीत प्रत्येक क्षणाला आम आदमी पक्ष (AAP) आणि भाजपमध्ये (BJP) चुरस दिसत आहे. क्षणाक्षणाला मतमोजणीचे चित्र पालटत आहे. सुरुवीताच्या टप्प्यात भाजपने बहुमताचा आकडा ओलांडून तब्बल 45 जागांवर आघाडी घेतली होती. मात्र, मतमोजणीच्या (Delhi Election Results 2025) दोन तासांनी हे चित्र पालटायला सुरुवात झाली आहे. मात्र, क्षणाक्षणाला मतमोजणीचे कल बदलत असल्याने अद्याप निश्चित चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.

मात्र, या सगळ्यात आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. कारण, 'आप'चे प्रमुख उमेदवार पिछाडीवर आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही समावेश आहे. नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल पिछाडीवर पडले आहेत. या मतदारसंघात भाजपचे प्रवेश वर्मा आघाडीवर आहेत. तर काँग्रेसच्या संदीप दीक्षितही पिछाडीवर आहेत.  तर कालकाजी मतदारसंघात 'आप'चा प्रमुख चेहरा असलेल्या आतिशी या पिछाडीवर आहेत. या मतदारसंघात भाजपचे आक्रमक नेते रमेश बिधुडी आघाडीवर आहेत. तर जंगपुरा मतदारसंघात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पिछाडीवर आहेत. या मतदारसंघात भाजपचे तरविंदर सिंह मारवा आघाडीवर आहेत.

आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून पोस्टल मते आणि ईव्हीएम यंत्रांमधील मतांच्या मोजणीत भाजपचे वरचष्मा राखला आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून अरविंद केजरीवाल, आतिशी, मनिष सिसोदिया यांनी एकदाही आघाडी घेतलेली नाही. हा 'आप'साठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा पराभव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतिशी आणि मनिष सिसोदिया यांच्यासारखे राष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय असलेले चेहरेही पराभवाच्या छायेत दिसत आहेत. मतमोजणीच्या सध्याच्या कलानुसार दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एकूण 70 जागांपैकी भाजप 49, आप 19 आणि काँग्रेस पक्ष दोन जागांवर आघाडीवर आहे. विशेष बाब म्हणजे दिल्लीतील अनेक मुस्लीमबहुल भागांमध्येही भाजपने मोठी मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे. दिल्लीत भाजपला विजय मिळाल्यास पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल कैकपटींनी वाढणार आहे.

आणखी वाचा

Delhi Election Result 2025 Live: दिल्ली विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात, निकालाचे प्राथमिक कल समोर, भाजप आणि आपमध्ये कोणाची सरशी?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड

व्हिडीओ

Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Special Report Pune Kalakar Katta : पुण्यातला कलाकार कट्टा हटवणार?; भाजपच्या नगरसेवकांची मागणी
Special Report MVA : मविआची मैत्री सेट तरच 'रेड कार्पेट'; Uddhav Thackeray विधान परिषदेवर जाणार?
Narhari Zirwal Special Report झिरवळांच्या कार्यालयात क्लार्कला 35 हजारांची लाच स्विकारताना अटक
NCP Merge Special Report शशिकांत शिंदेंच्या लेखामध्ये काय?,राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुठे अडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
Embed widget