एक्स्प्लोर
Advertisement
परिपत्रक वाचण्यात महाबीजकडून गफलत, जुन्या नोटा स्वीकारणार
मुंबई : केंद्राने काढलेल्या नोटाबंदीच्या नवीन परिपत्रकावरुन महाबीजच्या अधिकाऱ्यांची गफलत झाली, अशी कबुली महाबीजने दिली आहे. त्यामुळे बियाणे खरेदीसाठी महाबीजकडून जुन्या पाचशेच्या नोटा आता स्वीकारण्यात येतील.
नोटाबंदीनंतर केंद्र सरकारकडून काल नव्याने परिपत्रक काढण्यात आलं. त्यानतंर महाबीजने बियाणे विक्री केंद्र बंद केली. याबाबत माहिती मिळताच मुख्य सचिवांनी हस्तक्षेप केला. महाबीजच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत.
बियाणे खरेदीसाठी 500 च्या नोटा चालणार आहेत, असा त्या परिपत्रकाचा अर्थ आहे, असं कृषी विभागाने महाबीजला सांगितलं.
काय आहे सरकारचं नवीन परिपत्रक?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीच्या निर्णय जाहीर केल्यानंतर जुन्या पाचशे, हजारच्या नोटा महत्वाच्या ठिकाणी 24 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारल्या जात होत्या. यानंतर केंद्र सरकारने 15 डिसेंबरपर्यंत जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारण्यास पुन्हा मुदतवाढ दिली.
मात्र महाबीजने जुन्या नोटा आता स्वीकारल्या जाणार नाहीत, असा अर्थ घेतला. त्यामुळे राज्यातील बियाणे विक्री केंद्र बंद केली. मुख्य कृषी सचिवांना ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत.
संबंधित बातम्या :
बँकांमध्ये जुन्या 500, 1000 च्या नोटा बदलून मिळणार नाही
नोटाबंदी : सरकारच्या नवीन निर्णयानंतर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
1000ची नोट थेट बँकेतच जमा करा, 500च्या नोटा फक्त इथे स्वीकारणार!
काळा पैसेवाल्यांचा फास आवळला, बेहिशेबी रकमेवर 50 टक्के टॅक्स
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement