एक्स्प्लोर
लोकसभा निवडणूक : वंचित बहुजन आघाडीकडून एमआयएमसाठी दोन जागा सोडल्या
ओवेसी आणि भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात आज बैठक पार पडली. या बैठकीत या दोन्ही जागांबाबत निर्णय घेण्यात आला. उत्तर मध्य मुंबईच्या जागेवरही एमआयएमने आपला उमेदवार उतरवावा असा सल्ला आंबेडकरांनी ओवेसींना दिला आहे.
मुंबई : वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबाद आणि उत्तर मध्य मुंबईची जागा एमआयएमसाठी सोडण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी उमेदवार कोण असणार हे एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी ठरवणार आहेत.
ओवेसी आणि भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात आज बैठक पार पडली. या बैठकीत या दोन्ही जागांबाबत निर्णय घेण्यात आला. उत्तर मध्य मुंबईच्या जागेवरही एमआयएमने आपला उमेदवार उतरवावा असा सल्ला आंबेडकरांनी ओवेसींना दिला आहे.
औरंगाबादमधून वंचित बहुजन आघाडीतर्फे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
वंचित बहुजन आघाडी आणि उत्तर मध्य मुंबईची जागा एमआयएममध्ये औरंगाबादच्या जागेवरुन खलबते सुरु होती. दरम्यान आता तो तिढा सुटला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करण्यात येणार आहे. यापुढील सर्व निवडणुका या वंचित आघाडीच्या झेंड्याखाली लढणार असल्याचे आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे.
मतदारसंघ निहाय उमेदवारांची यादी :
1. धनराज वंजारी -वर्धा
2. किरण रोडगे -रामटेक
3. एन. के. नान्हे - भडांरा-गोंदिया
4. रमेश गजबे -गडचिरोली (चिमूर)
5. राजेंद्र महाडोळे - चंद्रपूर
6. प्रवीण पवार -यवतमाळ (वाशीम)
7. बळीराम सिरस्कार -बुलढाणा
8. गुवणंत देवपारे -अमरावती
9. मोहन राठोड - हिंगोली
10. यशपाल भिंगे - नांदेड
11. आलमगीर खान अखिल मोहम्मद खान - परभणी
12. विष्णू जाधव - बीड
13. अर्जुन सलगर - उस्मानाबाद
14. राम गारकर - लातूर
15. अजंली बावीस्कर - जळगाव
16. नितीन कांडेलकर - रावेर
17. शरदचंद्र वानखेडे - जालना
18. सुमन कोळी - रायगड
19. अनिल जाधव - पुणे
20. नवनाथ पडळकर - बारामती
21. विजय मोरे - माढा
22. जयसिंग शेंडगे - सांगली
23. सहदेव एवळे - सातारा
24. मारूती जोशी - (रत्नागिरी-सिंधुदुर्ग)
25. अरूणा माळी - कोल्हापूर
26. अस्लम बादशाहजी सय्यद - हाताकंगले
27. दाजमल गजमल मोरे - नंदुरबार
28. बापू बर्डे - दिंडोरी
29. पवन पवार - नाशिक
30. सुरेश पडवी - पालघर
31. ए. डी. सावंत - भिवंडी
32. मल्लिकार्जुन पूजारी - ठाणे
33. अनिल कुमार - मुंबई साउथ दक्षिण
34. संजय भोसले - मुंबई साउथ सेन्ट्रल(दक्षिण मध्य)
35. संभाजी शिवाजी काशीद - ईशान्य मुंबई
36. राजाराम पाटील - मावळ
37. अरूण साबळे - शिर्डी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement