एक्स्प्लोर

Gokul Meeting : गोकुळच्या सभेतून राबणाऱ्या दूध उत्पादकांना नेमकं काय मिळालं? 

गोकुळची 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल कसबा बावड्यातील महासैनिक दरबार हाॅलला सभा पार पडली. या गदारोळामध्येच गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील गोकुळचा एकूण कारभार आणि उलाढालीचा आढावा घेतला.

Gokul Meeting : अभूतपूर्व गोंधळात गोकुळची 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल कसबा बावड्यातील महासैनिक दरबार हाॅलला सभा पार पडली. या गदारोळामध्येच गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील गोकुळचा एकूण कारभार आणि उलाढालीचा आढावा घेतला. यावेळी महाडिक गटाकडून स्वागत प्रास्ताविक बंद करा, आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या अशा घोषणा देत होते. 

त्यानंतर  सत्तारूढ संचालक आणि सतेज पाटील तसेच मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना खुन्नस देत जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. या गदारोळात विश्वास पाटील आढावा घेणे सुरुच ठेवले. यावेळी शौमिका महाडिक यांनी आबाजी सभासदांना डोळ्यात पाहून उत्तरे द्या, सभासदांची किती काळ दिशाभूल करणार? असे प्रश्न विचारले. 

त्यानंतर गोकुळचे कार्यकारी अध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी सभेचे नोटीस वाचन केले. याला हात वर करून मंजुरी देण्यात आली. आयत्या वेळच्या विषयांचे वाचन सुरू झाल्यानंतर आपल्या प्रश्नांची उत्तरे दिली जात नसल्याचा आरोप करत शौमिका महाडिक यांनी सभात्याग केला. श्री भामटे दूध संस्थेच्या शिवाजी देसाई यांनी दूध वाहतूक निविदा नामंजूर झाल्यानंतर संघाविरुद्ध दावा दाखल झाला होता. या दाव्याचा निकाल संघाच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे श्री व्यंकटेश्वरा यांच्याकडून दाव्याच्या रक्कम वसुलीसाठी व्यंकटेश्वरावर दावा दाखल करण्याचा ठराव केला.

हसूर दूध ससंस्थेचेश्रीपती पाटील यांनी दूध संस्थांची शेअर मर्यादा वाढवू नये अशी मागणी करून दूध दरवाढ केल्याबद्दल संचालक मंडळाच्या अभिनंदन केले. 

संचालकांना गाड्या द्या

गोकुळचा कारभार वाढला पाहिजे, दूध संकलन वाढले पाहिजे यासाठी संचालकांना चार चाकी वाहने दिली पाहिजे अशी मागणी पी. डी. धुंदरे यांनी केली. 

गोकुळची बचत 10 कोटींवर

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा गोकुळची उलाढाल 378 कोटींनी वाढली असून सध्या उलाढाल 2 हजार 929 कोटी रुपये झाली आहे. 59 कोटी भाग भांडवल आहे. टँकर वाहतूक कपात 5 कोटी 8 लाख रुपये, महानंद दूध पॅकिंग बचत 65 लाख, अतिरिक्त रोजनदारी कर्मचारी कपात 1 कोटी 78 लाख, पशुखाद्य वाहतूक भाडे कपात 1 कोटी 75 लाख व अभियांत्रिकी विभागामार्फत विविध प्रकल्पातून झालेली बचत 42 लाख अशी एकूण दहा कोटींची बचत केली जात आहे.  पशुखाद्य विक्रीमध्ये 15 टक्के वाढ आहे. त्यामुळे 5 कोटी 76 लाख 47 हजार रुपये अनुदान देऊन दूध उत्पादकांना कमी किमतीत पशुखाद्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.

गोकुळच्या सभेत मंजूर झालेले महत्वाचे ठराव 

  • बाहेरील राज्यातून जातीवंत म्हैस खरेदी करणाऱ्या उत्पादकांना म्हैसांना व जाफराबादी म्हशीसाठी आता 20 ऐवजी 25 हजार अनुदान मिळणार 
  • मुरा म्हशीसाठी 25 ऐवजी 30 हजार रुपये अनुदान एक सप्टेंबरपासून देणार 
  • महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना विस्तारीकरण करणार 
  • व्यंकटेश्वरा गुडसवर दावा दाखल करणार 
  • कर्नाटक, गोव्याप्रमाणे दुध उत्पादकाला अनुदान मिळावे   
  • दूध संस्थांची शेअर मर्यादा वाढवू नये 
  • दूध दरवाढीबद्दल संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget