CM Eknath Shinde : अमित शाहांसोबत बंद खोलीत चर्चा झालीच नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कोल्हापुरात मोठा दावा
अमित शाह यांच्या सोबत बंद खोलीत चर्चा झालीच नाही, असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला. विशेष म्हणजे याच मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी सातत्याने भाजपवर घणाघाती प्रहार केला आहे.
कोल्हापूर : उबाठा गटाकडून 50 कोटी मिळावे म्हणून पत्र पाठवले गेलं, एका क्षणाचाही विचार न करता देऊन टाकले, तरीहीआमच्यावर 50 खोके म्हणून टीका करतात, अरे मनाची नाही तरी जनाची तरी वाटायला पाहिजे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील जाहीर सभेत केली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर यावेळी जोरदार टीका केली.
अमित शाह यांच्या सोबत बंद खोलीत चर्चा झालीच नाही
ते म्हणाले की, दिल्लीला मोदी साहेबांना अजित पवार आणि अशोक चव्हाण सोबत उद्धव ठाकरे गेले. यावेळी आत गेले आणि घालीन लोटांगण केले. सत्ता सोडायला तयार झाले, मला म्हणाले पुढे आपली सत्ता मिळेल का? म्हणजे सत्तेसाठी हे काहीही करायला तयार होते, अमित शाह यांच्या सोबत बंद खोलीत चर्चा झालीच नाही, असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला. विशेष म्हणजे याच मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी सातत्याने भाजपवर घणाघाती प्रहार केला आहे.
आता रोज रडगाणं सुरु आहे, हे चोरलं, ते चोरलं
ते म्हणाले की, यांनी (उद्धव ठाकरे) वैचारिक व्यभिचार केला, त्यांना कायमचं घरी बसवण्याची वेळ आली आहे. ही गर्दीच महायुतीच्या विजयाची नांदी आहे. बाळासाहेबांचा वारसा सांगताना मनगटात दम असावा लागतो, पण खूर्चीसाठी यांनी सगळं सोडलं. मातोश्रीवरून बाळासाहेबांची डरकाळी येत होती, तिथून आता रोज रडगाणं सुरु आहे, हे चोरलं, ते चोरलं, बाळासाहेब चोरायला वस्तू होते का? ते विचार होते, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावला.
अंबाबाईच्या आर्शीवार्दाने राज्याचा विकास होत आहे, शिवसेनेच्या प्रेमापोटी एकत्र आले आहेत. कोल्हापूरने महापूर पाहिला, शिवसैनिकांनी झोकून काम केलं, मी दहा ते 12 दिवस याठिकाणी होतो. मी कोल्हापुरातील त्यावेळी माणूस पाहिला. महापुरात गर्भवती महिलेला अडकली होती. NDRF मला म्हणाले रात्रीचं जाऊ शकत नाही, पण मी म्हटलं की मी थांबू शकत नाही. मी पुढे चाललो आणि इनडीआरएफचे पाठीमागून आल्याचे आठवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली.
राज्यात आम्ही क्रांती केली, 50 आमदार खांद्याला खांदा लावून आले. आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहोत. सभेला झालेली गर्दी पाहता शिवसेना कोणाची सांगण्याची गरज नाही. कोल्हापुरात शिवसेनेचा झंझावात पाहिला. दोन दिवस अधिवेशन पार पडलं. यामध्ये अनेक विषयांना हात घातल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या