CM Eknath Shinde : मातोश्रीवरून बाळासाहेबांची डरकाळी येत होती, तिथून आता रोज रडगाणं सुरुय; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला
मातोश्रीवरून बाळासाहेबांची डरकाळी येत होती, तिथून आता रोज रडगाणं सुरु आहे, हे चोरलं, ते चोरलं, बाळासाहेब चोरायला वस्तू होते का? ते विचार होते, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावला.
कोल्हापूर : अंबाबाईच्या आर्शीवार्दाने राज्याचा विकास होत आहे, शिवसेनेच्या प्रेमापोटी एकत्र आले आहेत. कोल्हापूरने महापूर पाहिला, शिवसैनिकांनी झोकून काम केलं, मी दहा ते 12 दिवस याठिकाणी होतो. मी कोल्हापुरातील त्यावेळी माणूस पाहिला. महापुरात गर्भवती महिलेला अडकली होती. NDRF मला म्हणाले रात्रीचं जाऊ शकत नाही, पण मी म्हटलं की मी थांबू शकत नाही. मी पुढे चाललो आणि इनडीआरएफचे पाठीमागून आल्याचे आठवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली.
ते म्हणाले की, यांनी (उद्धव ठाकरे) वैचारिक व्यभिचार केला, त्यांना कायमचं घरी बसवण्याची वेळ आली आहे. ही गर्दीच महायुतीच्या विजयाची नांदी आहे. बाळासाहेबांचा वारसा सांगताना मनगटात दम असावा लागतो, पण खूर्चीसाठी यांनी सगळं सोडलं. मातोश्रीवरून बाळासाहेबांची डरकाळी येत होती, तिथून आता रोज रडगाणं सुरु आहे, हे चोरलं, ते चोरलं, बाळासाहेब चोरायला वस्तू होते का? ते विचार होते, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावला.
ते दिसतात तसे इनोसंट नाहीत
तत्पूर्वी, महाअधिवेशनाच्या समारोपात बोलतानाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले की, शरद पवार म्हणाले तुम्ही मुख्यमंत्री व्हा असे म्हटल्यानंतर तेव्हा मला सांगताना यांचा चेहरा रडवेला झाला होता. तेव्हाच यांना मोह झाल्याचे मला जाणवले. मी कधीच पदाला हापापलो नव्हतो, त्यांनी मला आधीच सांगितले असते तर मी तसा माहोल तयार केला असता. ते दिसतात तसे इनोसंट नाहीत त्यामागे अनेक चेहरे आहेत, अशी टीका त्यांनी केली.
मोदींना भेटायला गेले आणि बाहेर आल्यावर घाम फुटला
ते पुढे म्हणाले की, एक चेहरे पे कई चेहरे लोग लगाते है लोग. माझा आवाज असा बंद करु नका, तसा तो बंद होणार नाही. माझ्यासोबत शिवसैनिक आहेत. लग्न एका सोबत, हनीमून एका सोबत असं त्यांनी केलं आहे. हे मी संसदीय शब्द बोलतो, मी कधीही असंसंदीय शब्द बोलत नाही. मविआसोबत दिल्लीला गेले होते मोदींना भेटायला तेव्हा एकटेच गेले. केबिनमध्ये मोदींना भेटायला गेले आणि बाहेर आल्यावर घाम फुटला होता. दोन ग्लास पाणी प्यायले होते हे मला अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी सांगितल्याचा टोला त्यांनी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या