(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gandhinagar Market Kolhapur : गांधीनगरात मालवाहू वाहनांवर निर्बंध; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 27 ऑक्टोबरपर्यंत निर्णय लागू
Gandhinagar Market Kolhapur : कोल्हापूर पोलिसांनी जड आणि मध्यम माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना गांधीनगर मार्केटमध्ये 27 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत प्रवेशबंदी केली आहे.
Gandhinagar Market Kolhapur : कोल्हापूर पोलिसांनी जड आणि मध्यम माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना गांधीनगर मार्केटमध्ये 27 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत प्रवेशबंदी केली आहे. गांधीनगर हे कोल्हापूरचे सर्वात मोठे घाऊक आणि किरकोळ व्यापारी बाजार आहे.
दरवर्षी दिवाळीत बाजारात मोठी गर्दी असते. संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील व्यापारी सर्व प्रकारचा माल घेण्यासाठी गांधीनगरला येत असतात. तसेच, दिवाळीपूर्वी 25,000 हून अधिक लोक गांधीनगर येथे खरेदी करतात. बाजारपेठेत एकच मोठा रस्ता आहे आणि प्रचंड गर्दीमुळे दोन्ही टोकांना अडथळे निर्माण होतात. विशेषत: राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होतो.
पादचारी तसेच ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी अवजड, जड व मध्यम मालवाहतूक करणाऱ्या मोटर वाहनांना बाजारपेठेतील प्रवेशास व माल चढउतार करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक व प्रशासकीय वाहनांना वगळण्यात आले आहे.
असे असतील बदल
- सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत तनवाणी कॉर्नर ते गांधीनगरकडे मालवाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनांना प्रवेश बंद
- गणेश टॉकीज ते वळीवडे कॉर्नर मुख्य रस्त्यावर चारचाकी वाहनांना प्रवेश बंद
- चिंचवाड, वळिवडेत जाण्यासाठी रिक्षा, मिनी टेम्पो, नागरिकांच्या वाहनांना कोयना कॉलनी, सरकारी दवाखानामार्गे वळिवडेत किंवा चिंचवाडमध्ये जाता येईल.
- ट्रान्स्पोर्ट लाईनच्या अवजड, जड वाहनांना ये-जा करण्यासाठी तावडे हॉटेल, उचगाव फाटा, गडमुडशिंगी, चिंचवाड मार्गे गांधीनगर असा आहे.
- ट्रान्स्पोर्ट लाईनमधून गांधीनगर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना माल देण्या-घेण्यासाठी रिक्षा, मिनी टेम्पो यातून रात्री 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मुभा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या