(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Radhanagari Dam : राधानगरी धरणाचा स्वयंचलित चौथा दरवाजाही उघडला, पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल
Radhanagari Dam : राधानगरी धरणाचे आतापर्यंत स्वयंचलित चार दरवाजे उघडले आहेत. धरणाचे एकूण 4 दरवाजे (3,4,5,6 ) उघडले गेले आहेत. दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी धरणाचे स्वयंचलित द्वार 4 उघडले आहे.
Radhanagari Dam : कोल्हापूर शहरामध्ये सकाळपासून पावसाने उघडीप घेतली असली, तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ सुरुच आहे. राधानगरी धरणाचे आतापर्यंत स्वयंचलित चार दरवाजे उघडले आहेत. धरणाचे एकूण 4 दरवाजे (3,4,5,6 ) उघडले गेले आहेत. दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी धरणाचे स्वयंचलित द्वार 4 उघडले आहे.
दरम्यान, पाॅवर हाऊसमधून 1600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहेत, तर उघडलेल्या चार दरवाज्यातून 5712 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे धरणातून 7 हजार 312 क्युसेक सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल
दरम्यान, पावसाने उसंत घेतली असली, तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेला पाऊस आणि राधानगरी धरणातून होत असलेला पाण्याचा विसर्गाने पंचगंगेची पाणी पातळी सुद्धा धोक्याच्या दिशेने चालली आहे. आज दुपारी 4 वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 40 फूट 10 इंचावर गेली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट, तर धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यातील एकुण पाण्याखालील एकूण 76 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
दुसरीकडे, गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या धुवाँधार पावसाने (Kolhapur Rain Update) पंचगंगा नदीने मोसमात प्रथमच इशारा पातळी गाठली आहे. काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 96.9 मिमी पाऊस झाला. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर केर्लीनजीक रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे गगनबावडा मार्ग सुरु झाला आहे.
पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पाटबंधारे विभागाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठ्याची स्थिती
राधानगरी 236.13 दलघमी, तुळशी 88.19 दलघमी, वारणा 879.31 दलघमी, दूधगंगा 599.89 दलघमी, कासारी 65.46 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 66.25 दलघमी, पाटगाव 93.49 दलघमी, चिकोत्रा 39.72 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, आंबेआहोळ 30.98 जंगमहट्टी, जांबरे, चित्री मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
गेल्या 24 तासात तालुकानिहाय झालेला पाऊस
हातकणंगले- 12, शिरोळ -3.9, पन्हाळा- 48.9, शाहूवाडी- 56.2, राधानगरी- 54.2, गगनबावडा- 96.9, करवीर- 26.4, कागल- 13.6, गडहिंग्लज- 13.9, भुदरगड- 35.6, आजरा- 44.5, चंदगड- 51.4
इतर महत्त्वाच्या बातम्या