Eknath Shinde list of possible ministers : प्रकाश आबिटकर की राजेश क्षीरसागर की राजेंद्र पाटील यड्रावकर? शिंदेसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर!
Eknath Shinde List of Possible Ministers : शिंदेंना महायुती सरकारमध्ये 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. प्रताप सरनाईक आणि विजय शिवतारे यांनाही नव्याने संधी मिळण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde List of Possible Ministers : महायुती सरकारला राज्यामध्ये एकहाती सत्ता मिळाली असली, तरी अजूनही मंत्रीपदावरून तिन्ही पक्षांमध्ये मतभेद सुरूच आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईपासून दिल्लीपर्यंत तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून मंत्रीपदांचा तिढा सोडवण्यासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत. मात्र अजूनही फॉर्मुला निश्चित झालेला नाही. मात्र, शिवसेना शिंदे गटाकडून संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे. यामध्ये सहाजण कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, तर तिघेजण राज्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात.
शिंदेसेनेत कोणाला कॅबिनेट मंत्रीपदाची संधी?
शिवसेना शिंदे गटाकडून शंभूराज देसाई, दादा भुसे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, प्रताप सरनाईक, भरत गोगावले आणि संजय शिरसाठ हे कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे भरत गोगावले यांची गेल्या अडीच वर्षांपासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षा होती ती त्यांची प्रतीक्षा यंदा पूर्ण होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या प्रवक्ते पदाची भूमिका पार पाडत असलेल्या संजय शिरसाठ यांनाही कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. शिंदेंना महायुती सरकारमध्ये 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. प्रताप सरनाईक आणि विजय शिवतारे यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरमध्ये कोणाला संधी मिळणार?
दरम्यान, राज्यमंत्रीपदावर योगेश कदम, विजय शिवतारे यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीचे दहा उमेदवार निवडून आले आहेत शिंदेंच्या सेनेचा स्ट्राईक रेट शंभर टक्के असल्याने कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. शिवसेना शिंदे गटाच्या संभाव्य राज्यमंत्रीपदांमध्ये प्रकाश आबिटकर किंवा राजेंद्र पाटील यड्रावकर या दोघांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून कोल्हापूरमधून राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर सुद्धा मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. त्यांनी मंत्रीपदावर दावा सुद्धा केला. मात्र संभाव्य यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे प्रकाश आबिटकर किंवा राजेंद्र यड्रावकर या दोघांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे
एकनाथ शिंदे दिलेला शब्द पूर्ण करणार का?
कोल्हापूरमध्ये प्रचारामध्ये प्रकाश आबिटकर निवडून आलास त्यांना मंत्रीपदाचे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपद देऊन तो शब्द पूर्ण केला जाणार का? याकडे सुद्धा लक्ष असेल.महाविकास आघाडीमध्ये सरकारमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर आरोग्य राज्यमंत्री होते. त्यामुळे यड्रावकर यांना पुन्हा एकदा मंत्रीपदाची संधी दिली जाणार का? याकडे लक्ष असेल. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना महायुतीकडून पाठिंबा देण्यात आला होता.
इतर महत्वाच्या बातम्या