एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

National Investigation Agency : बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी NIA कडून देशभरात छापेमारी; कोल्हापुरातून एकाला उचलले

कारवाईत बनावट नोटा, प्रिंटिंग पेपर, प्रिंटर आणि डिजिटल गॅझेट NIA कडून जप्त करण्यात आली. गेल्या महिन्यात म्हणजेच 24 नोव्हेंबर रोजी नोंदवलेल्या एफआयआर प्रकरणाच्या अनुषंगाने ही छापेमारी करण्यात आली. 

नवी दिल्ली : देशात बनावट नोटांचा सुळसुळाट सुरुच असल्याने  बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (National Investigation Agency) आज (2 डिसेंबर) देशभरात छापेमारी केली. चार राज्यातील विविध भागांमध्ये छापेमारी करत बनावट नोटांच रॅकेट उध्वस्त केलं आहे. या कारवाईत बनावट नोटा, प्रिंटिंग पेपर, प्रिंटर आणि डिजिटल गॅझेट NIA कडून जप्त करण्यात आली आहेत. एनआयएकडून गेल्या महिन्यात म्हणजेच 24 नोव्हेंबर रोजी नोंदवलेल्या एफआयआर प्रकरणाच्या अनुषंगाने ही छापेमारी करण्यात आली. 

सीमेपलीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची Fake Indian Currency Notes (FICN) तस्करी करण्यासाठी आणि भारतात त्यांच्या चलनाला चालना देण्यासाठी संशयित व्यक्तींनी रचलेल्या मोठ्या कटाशी संबंधित 24 नोव्हेंबर रोजी नोंदवलेल्या गुन्ह्याच्या NIA च्या तपासाचा एक भाग म्हणून हे छापे टाकण्यात आल्याचे एनआयए प्रवक्ते म्हणाले.

महाराष्ट्रातून  कोल्हापूर जिल्ह्यातील राहुल तानाजी पाटील याचाही छापेमारीत समावेश

एनआयएच्या पथकांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आरोपी राहुल तानाजी पाटील उर्फ जावेद, उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर जिल्ह्यातील विवेक ठाकूर उर्फ आदित्य सिंह आणि कर्नाटकातील बल्लारी जिल्ह्यातील संशयित महेंद्र, यवतमाळ जिल्ह्यातील शिवा पाटील उर्फ भीमराव यांच्या घराची झडती घेतली. बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील शशी भूषणवरही छापे टाकण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

ठाकूरच्या घरातून 6,600 रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या बनावट भारतीय चलनी नोटा (FICN) (500, 200 आणि 100 रुपयांच्या) आणि चलन छपाईच्या कागदासह जप्त करण्यात आल्याचे प्रवक्त्याने सांगितले. ठाकूर आणि पाटील आणि इतरांनी सीमावर्ती देशांतून बनावट नोटा आणि छपाईचे सामान आणले. या अधिकाऱ्याने सांगितले की, बनावट चलन भारतभर पसरवले जात होते. पाटील बनावट नोटा पुरवण्याचे आश्वासन देऊन पेमेंट करण्यासाठी फसव्या पद्धतीने मिळवलेल्या सिमकार्डचा वापर करत होता, असेही प्रवक्त्याने सांगितले. महेंद्रच्या घराची झडती घेतल्याने FICN तयार करण्यासाठी प्रिंटर जप्त करण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dombivli Ravindra Chavan CCTV :मंत्र्याच्या कारमधून उतरला अन् थेट अंगावर धावला,भाजप नेत्याचा प्रताप!Thar Car Accident : ताबा सुटला,स्टॅन्डवरील तिघांना उडवलं, श्रीगोंद्यात थारच्या अपघाताचा थरारा!Buldhana Python | लोणार सरोवर परिसरात सर्पमित्रांनी रेस्क्यू करत दहा फूटी अजगराला दिलं जीवदानKiran Samant on Vidhan Sabha : विजयाचं श्रेय थेट लेकीला दिलं, किरण सामंतांकडून घरच्यांचं कौतूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Embed widget