Hasan Mushrif on PM Modi : आम्ही बारामतीमध्ये लढणार, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्हाला प्रामाणिक राहावंच लागेल : हसन मुश्रीफांनी मांडली भूमिका
आमच्यासोबत अनिल देशमुखही होते. नंतर त्यांनी नकार दिला, त्यांनी इतकं खोटं बोलू नये. अजितदादांना सुपारी द्यायचा प्रश्न येत नाही. प्रफुल्ल पटेल यांनी सविस्तर सांगितलं आहे, असं मुश्रीफ म्हणाले.
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असलेले अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे भाजपसोबत झालेल्या सर्व बैठकांना माझ्यासोबत उपस्थित होते. भाजपला अनिल देशमुख हे मंत्रिपदी नको होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला. आता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी (Hasan Mushrif) कोल्हापुरात (Kolhapur) बोलताना अजित पवारांनी जे सांगितलं ते वस्तूस्थितीला धरून असल्याचे म्हटले आहे. शरद पवार का नकार देत आहेत हे अजित पवार यांना कळलेलं नाही, मग आम्हला कसं कळणार? असेही मुश्रीफ म्हणाले.
अजितदादांना सुपारी द्यायचा प्रश्न येत नाही
अजित पवार गटाकडून रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी गौप्यस्फोट केला होता. हसन मुश्रीफ म्हणाले की, आमच्यासोबत अनिल देशमुखही होते. नंतर त्यांनी नकार दिला, त्यांनी इतकं खोटं बोलू नये. अजितदादांना सुपारी द्यायचा प्रश्न येत नाही. प्रफुल्ल पटेल यांनी सविस्तर सांगितलं आहे.
मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्हाला प्रामाणिक राहावंच लागेल (Hasan Mushrif on PM Modi)
हसन मुश्रीफ यांनी आगामी लोकसभेला बारामती लढणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आता जिथं आमचे खासदार आहेत त्या जागा आम्हीच लढवणार आहोत. यामध्ये बारामती लोकसभेचाही समावेश आहे. बारामतीत गृहकलचा प्रश्न नाही. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी (Hasan Mushrif) आम्हाला प्रामाणिक राहावंच लागेल, असेही त्यांनी सांगितले.
दुसरा पक्ष कसा काढणार
अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर जितेंद्र आव्हाड यांनी हिंमत असल्यास दुसरा पक्ष काढा, असे आव्हान अजित पवारांना दिले होते. यावर बोलताना त्यांनी सांगितले की, ज्या पक्षात इतकी वर्ष काम केलं, तो पक्ष सोडून दुसरा पक्ष कसा काढणार? जो पक्ष कष्ट करून वाढवला त्याबद्दल वेगळ्या भावना असतात.
जयंत पाटलांनी सांगितला घटनाक्रम!
दुसरीकडे, अजित पवार यांनी केलेल्या धक्कादायक दाव्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात कलगीतुरा रंगला आहे. अजित पवार यांनी आमदार प्रकाश सोळंकेंवरून केलेल्या दाव्यानंतर जयंत पाटील यांनीही खुलासा करत अजित पवार यांना टोला लगावला आहे. त्यांना (प्रकाश सोळंके) मंत्रीच व्हायचं होत. मला मंत्री का केलं नाही म्हणून ते चिडून आले. ते राजीनामा देत होते, पणं मी त्यांना बोलावलं. त्यावेळी अजित पवारांनी माझ्यासमोरच सोळंखीना सांगितले की तुम्हाला पक्षाचे कार्याध्यक्ष पद देतो, पण नंतर मला कधी पक्षाने तसे सांगितल नाही. मला सांगितलं असतं तर मी राजीनामा दिलाच असता, असे जयंत पाटील यांनी आज (2 डिसेंबर) पुण्यात बोलताना सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या