Kolhapur Ganesh 2022 : विकेंडलाच कोल्हापूरमधील देखावे पाहण्यासाठी खुले होणार! मोठ्या मूर्तीही दर्शनासाठी खुल्या
विकेंडलाच कोल्हापूर शहरातील रस्ते देखावे पाहण्यासाठी फुलून जाण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव,शाहू महाराज, बळीराजा, ऐतिहासिक तसेच पौराणिक देखावे करण्यावर भर देण्यात येत आहे.
Kolhapur Ganesh 2022 : तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा कोल्हापूरच्या गणेशोत्सवाला वेगळाच रंग चढला आहे. याची झलक गणरायांच्या आगमनादिवशी दिसून आली. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये भक्तीमय आणि अपूर्व आनंदमय वातावरणात लाडक्या बाप्पांचे सलग दोन दिवस भव्य मिरवणुकीने आगमन झाले. पारंपरिक वाद्यांसह डीजे दणदणाटामध्ये गणरायांचे आगमन झाल्याचे दिसून आले. डीजे आणि लेझर शोमुळे आगमन मिरवणूक चांगलीच झळाळून निघाली. अनेक मंडळांनी गणेश चतुर्थीपूर्वीच गणरायांची मूर्ती आणून प्रतिष्ठापना केली आहे.
यंदा कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील गणेशोत्सव हात सैल सोडूनच साजरा होणार आहे. त्यामुळे राजकीय इच्छुकांच्या मांदियाळींकडून सढळ हस्ते मदत करण्यात आली आहे. अनेक मंडळांकडून देखाव्याची तयारी करण्यात आली आहे.
विंकेडला कोल्हापूर शहरातील खुले होणार, मंडळांकडून तयारी सुरु
बहुतांश मंडळांकडून आगमन मिरवणुकीची लगभग पार पाडल्यानंतर आता देखाव्यांची तयारी सुरु केली आहे. घरगूती गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर शहरातील देखावे पाहण्यासाठी खुले होतात. मात्र, मंडळांकडून यंदा जय्यत तयारी करण्यात आल्याने देखावे उद्यापासूनच पाहण्यासाठी खुले होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकेंडलाच कोल्हापूर शहरातील रस्ते देखावे पाहण्यासाठी फुलून जाण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव,शाहू महाराज, बळीराजा, ऐतिहासिक तसेच पौराणिक देखावे करण्यावर भर देण्यात येत आहे.
मुर्त्याही दर्शनासाठी खुल्या
कोल्हापूरमध्ये देखाव्यासह भव्य आणि आकर्षक मुर्त्याही आकर्षणाचा विषय आहे. शिवाजी चौकातील महागणपती, संभाजीगरमधील नवसाला पावणारा गणपती, शाहुपूरीमधील राधाकृष्ण तरुण मंडळाची प्रतिकृती यंदा तुलनेत लवकर खुल्या झाल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या