(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ichalkaranji Ganesh Immersion : पंचगंगा नदीत कोणत्याही परिस्थितीत गणेश मूर्तींचे विसर्जन करता येणार नाही! जिल्हाधिकाऱ्यांचा 'कोल्हापूरी बाणा'!
Ichalkaranji Ganesh Immersion : पंचगंगा नदीत कोणत्याही परिस्थितीत गणेश मूर्तींचे विसर्जन करता येणार नाही, अशी कणखर भूमिका कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतली आहे.
Ichalkaranji Ganesh Immersion : पंचगंगा नदीत कोणत्याही परिस्थितीत गणेश मूर्तींचे विसर्जन करता येणार नाही, अशी कणखर भूमिका कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतली आहे. प्रत्येक गोष्ट कायद्याने करायचं झालं, तर चळवळीला बाधा निर्माण होईल, दिशाभूल करणाऱ्या कोणत्याही माहितीला बळी पडू नका, अशा कडक शब्दात त्यांनी पंचगंगा नदीमध्येच गणेश विसर्जन करणार, अशा भूमिकेवर आडून बसललेल्यांना सुनावले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची कणखर भूमिका
पंचगंगा नदीत कोणत्याही परिस्थितीत गणेश मूर्तींचे विसर्जन करता येणार नाही, सर्व गणेश मंडळांना आवाहन करतो नदी प्रदूषित होणार नाही याची काळजी घ्यावी, प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सोयीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. इचलकरंजी याठिकाणी नदीत बाप्पाचे विसर्जन करण्याबाबत मागणी केली होती. जिल्हा प्रशासनामुळे घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे आमदार प्रकाश आवाडे यांच्यातला वाद चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, राहुल रेखावार यांनी इचलकरंजी गणेश विसर्जनाबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
पंचगंगेगची गटारगंगा होत चालल्याने कोणत्याही परिस्थितीत नदीचे प्रदुषण आणखी वाढू देऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि अनेक साामाजिक संघटनांनी घेतली आहे. असे असताना लोकप्रतिनिधी असूनही प्रकाश आवाडे यांनी घेतलेल्या आडमुठेपणामुळे नदी प्रदुषित करण्याचा विडा उचलला आहे का? अशी शंका उपस्थित झाली आहे.
नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
यावेळी ते म्हणाले की, इतर बाबींपेक्षा गणेश विसर्जनामुळे कमी प्रदूषण होते हा तर्क चुकीचा आहे. वाहत्या पाण्यात किंवा नदीत गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याबाबत भूमिका चुकीची आहे. काही नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या मार्फत नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. कोल्हापूरसह इचलकरंजी शहरात मूर्ती विसर्जनासाठी कुंड तयार करण्यात आले आहेत, मूर्तींवरील रासायनिक रंगामुळे पाण्याचं प्रदूषण व्हायला सुरुवात होते. त्यामुळे नदीकाठावर असलेल्या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
दरम्यान, नदीवेस नाक्यापासून यशोदा पुलापर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूस शक्य त्याठिकाणी मोठे कृत्रिम जलकुंड तयार करण्याचा निर्णय इचलकरंजी मनपा प्रशासनाकडून यापूर्वीच घेण्यात आला. शहरात विविध 100 ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात येणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या