Sugarcane Crushing : राज्यात ऊस गळीत हंगाम 15 दिवस आधीच सुरु होणार? साखर आयुक्तालयाची राज्य सरकारला शिफारस
Sugarcane Crushing : सुमारे 15 दिवस अगोदर म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून 2022-23 हंगामासाठी कारखान्यांना ऊस गाळप सुरू करण्याची परवानगी देण्याची शिफारस पुण्यातील साखर आयुक्तालयाने राज्य सरकारला केली आहे.
![Sugarcane Crushing : राज्यात ऊस गळीत हंगाम 15 दिवस आधीच सुरु होणार? साखर आयुक्तालयाची राज्य सरकारला शिफारस Sugarcane crushing season will start 15 days earlier in maharashtra Attention to the decision of the State Govt Sugarcane Crushing : राज्यात ऊस गळीत हंगाम 15 दिवस आधीच सुरु होणार? साखर आयुक्तालयाची राज्य सरकारला शिफारस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/194b2cee6ada7af4d2aa6c881eeb5a73166210409740288_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sugarcane Crushing : दरवर्षीच्या वेळापत्रकाच्या सुमारे 15 दिवस अगोदर म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून 2022-23 हंगामासाठी कारखान्यांना ऊस गाळप सुरू करण्याची परवानगी देण्याची शिफारस पुण्यातील साखर आयुक्तालयाने राज्य सरकारला केली आहे.चालू मोसमामध्येही ऊसाचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे. राज्यात ऊसाचे जास्त उत्पादन झाल्याने मागील हंगाम 15 जूनपर्यंत चालला होता.
मराठवाडा सारख्या भागात मागील ऊस गाळप करण्यास विलंब झाला होता. अतिरिक्त ऊसाचे गाळप करण्यासाठी साखर कारखाने सज्ज नसल्याने हजारो एकरावरील ऊस शेतकऱ्यांनीच नष्ट केल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले की, साखर आयुक्तालयाने गळीत हंगाम लवकर सुरू करण्याची सूचना केली आहे. तथापि, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील समिती सप्टेंबरच्या मध्यापर्यंत यावर निर्णय घेईल. हंगाम लवकर सुरु केल्यास अतिरिक्त ऊसाचा प्रश्न उद्भवणार नाही.
400 तोडणी यंत्रे घेण्याचे नियोजन
गेल्या हंगामात राज्यात विक्रमी उसाचे गाळप झाल्याने देशातील सर्वाधिक साखरेचे उत्पादन केले. इथेनॉल उत्पादनातही राज्य अव्वल आहे. अधिक इथेनॉलचे उत्पादन करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी साखर कारखाने करत आहेत आणि त्यानुसार उत्पादन क्षमता वाढवण्याचा विचार आहे. मराठवाड्यातील कारखान्यांना जादा उसाचे गाळप करण्यासाठी राज्याच्या इतर भागातून कापणी यंत्रे या प्रदेशात तैनात करण्यात आली होती. या वेळी, साखर आयुक्तालय शेवटच्या उसापर्यंत गाळप व्हावे यासाठी आणखी 400 तोडणी यंत्रे घेण्याचे नियोजन करत आहे.
ऊसाची नोंदणी करण्यासाठी मोबाईल अॅप सुरू करण्याची योजना
दरम्यान, साखर आयुक्तालयाने जवळच्या कारखान्यांमध्ये गाळप करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाची नोंदणी करण्यासाठी मोबाईल अॅप सुरू करण्याची योजना आखली आहे. गाळपासाठी नोंदणी करूनही कारखाने ऊसतोड टोळीला वेळेवर पाठवत नाहीत, गाळप करण्यास उशीर झाल्याने गोडवा, उत्पादन आणि उत्पन्नात घट होत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. एखाद्या विशिष्ट कारखान्याने शेतात कटर पाठवण्यास नकार दिल्यास साखर आयुक्तालय हे काम इतर कारखान्यांना देईल.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)