Kolhapur Ganesh Darshan : कोल्हापुरात गणेशोत्सव उत्साह टिपेला; शहरात कोणत्या मंडळाच्या ठिकाणी काय पाहता येईल?
थायलंडमधील पुरातनकालीन मूर्ती, लालबागचा राजा दरबार, कैलास पर्वतातून प्रगट झालेल्या शंकर महाराज यांच्यावरील देखावा, सोशल मीडियाच्या विळख्यातून समाजाला मुक्त करणाऱ्या रूपातील गणेशमूर्ती आकर्षण आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात (Kolhapur Ganesh Darshan) गणेशोत्सवचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. शहरासह जिल्ह्यात आज घरगुती गणपती विसर्जन पार पडल्याने देखावे पाहण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. शहरातील देखावे पाहण्यासाठी सुरु झाले आहेत. चांद्रयान मोहिमेची माहिती देणारा देखावा, थायलंडमधील पुरातनकालीन मूर्ती, लालबागचा राजा दरबार, कैलास पर्वतातून प्रगट झालेल्या शंकर महाराज यांच्यावरील देखावा, सोशल मीडियाच्या विळख्यातून समाजाला मुक्त करणाऱ्या रूपातील गणेशमूर्ती आकर्षण आहेत.
महापालिका, लक्ष्मीपुरी परिसरात छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाची एकवीस फुटी महागणपती, संयुक्त छत्रपती शिवाजी चौक मंडळाची आकर्षक मूर्ती, मेढे तालीम मंडळाचा धनकवडीचे शंकर महाराज देखावा, जनरल मटण फिश मार्केट मंडळाचा संत बाळूमामा देखावा, सोमवार पेठ तरुण मंडळाची गरुडावर स्वार रूपातील मूर्ती, स्वयंभू गणेश मित्र मंडळाची सोशल मीडियाच्या विळख्यातून समाजाला मुक्त करणाऱ्या रूपातील गणेशमूर्ती आकर्षण आहे.
तसेच गाईड मित्र मंडळाची ऑक्टोपसवर स्वार गणेशमूर्ती, सत्यनारायण तालीम मंडळाचा कैलास पर्वतातून प्रगट झालेल्या शंकर महाराज यांच्यावरील देखावा, दक्षता तरुण मंडळाची (पोलिस लाईन) प्राचीन काळातील अवतार रूपातील गणेशमूर्ती आकर्षण आहे. राजेश सांस्कृतिक मंडळ (बलराम कॉलनी, सुतारमळा) आकर्षक गणेशमूर्ती, कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळाची काल्पनिक मंदिराची 15 फुटी प्रतिकृती आकर्षण आहे.
सुभाष रोडवरील देशप्रेमी तरुण मंडळाची भगवान शंकराच्या रूपातील गणेशमूर्ती, शिवशक्ती तरुण मंडळाची (फोर्ड कॉर्नर) श्रीराम अवतारातील गणेशमूर्ती, न्यू लक्ष्मीपुरी मित्र मंडळाची (फायटर्स ग्रुप) श्रीराम अवतारातील गणेशमूर्ती आहे. गोरक्षनाथ मित्र मंडळाची आकर्षक गणेशमूर्ती आहे. संयुक्त सेवा मंडळांचा चांद्रयान मोहिमेची माहिती देणारा देखावा आहे. न्यू यंगस्टार फ्रेंड्स सर्कलची आकर्षक गणेशमूर्ती आहे.
इतर महत्वाच्या बातम्या