एक्स्प्लोर

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 430 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु; गावगाड्याचे कारभारी ठरणार

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 430 ग्रामपंचायतींसाठी (Kolhapur District Gram Panchayat Election) आज सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे.

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 430 ग्रामपंचायतींसाठी (Kolhapur District Gram Panchayat Election) आज सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे. या मतदानासाठी प्रशासनाकडून पूर्णपणे तयारी करण्यात आली आहे. मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना गावोगावी साहित्यांसह शनिवारी रवाना करण्यात आले. तालुका पातळीवर या मतदान  साहित्यांचे वाटप काल करण्यात आले. दरम्यान, मतमोजणी मंगळवारी होणार आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच या कालावधीत मतदान होणार आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District Gram Panchayat Election) यापूर्वी 60 गावांमधील सरपंच व विविध गावातील 847 सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत. ज्या गावात निवडणूक लागली त्या गावातील जाहीर प्रचाराची शक्तिप्रदर्शनाने झाली होती. सरपंच पदासाठी 414 जागांसाठी 1193 उमेदवार तर सदस्यपदाच्या 4 हजार 402 जागांसाठी  रिंगणात असलेल्या 8995 उमेदवारांचे भवितव्य आज मशीन बंद होईल.निवडणुकीसाठी 2015 केंद्रे आहेत. दहा हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना यापूर्वीच प्रशिक्षण देण्यात आले आहे.

मतदान केंद्रांवर 144 कलम लागू 

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District Gram Panchayat Election) 430 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार असल्याने मतदान केंद्रांवर 144 कलम लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश जारी केला आहे. त्यामुळे मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात  राजकीय पक्षांचे बुथ लावणे,  प्रचार साहित्य बाळगणे तसेच मोबाईलचा वापरास प्रतिबंध असेल.

निवडणुकीसाठी कडक बंदोबस्त

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कोल्हापूर पोलिस सज्ज आहेत. सर्वच मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शीघ्र कृती दल आणि राज्य राखील पोलिस दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 4 हजार पोलिस अधिकारी - कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. बाहेरील जिल्ह्यातील बंदोबस्तही मागविण्यात आला असून 10 अधिकारी, 100 कर्मचारी मदतीला घेण्यात आले आहेत. सध्या निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी 137 गावे संवेदनशील आहेत. या गावांवर पोलिस प्रशासनाचे विशेष लक्ष असेल. करवीर, शिरोळ, कागल आणि हातकणंगले तालुक्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नाही. त्यामुळे या चार गावांमध्ये कारभारी ठरवण्यासाठी सर्वाधिक चुरस आहे. विधानसभेची गणिते या निवडणुकीतून निश्चित होतील.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Embed widget