Karul Ghat : करुळ घाट 26 ऑगस्टपासून सुरु होणार, चाकरमान्यांसह वाहतूकदारांना मोठा दिलासा
करूळ घाटातून शुक्रवारपासून वाहतूक सुरू होणार असल्याने वाहतूकदारांना दिलासा मिळाला आहे. करुळ घाटामध्ये खचलेल्या रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून भिंत उभारण्याचे काम पूर्ण झालं आहे.
Karul Ghat : जुलै महिन्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कोल्हापूरमधून कोकणात जाणारे दोन्ही मार्ग बंद झाले होते. करुळ घाटात दरड कोसळल्याने 7 ऑगस्टपासून जड तसेच अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती.
करुळ घाटातील खचलेल्या ठिकाणी क्राँक्रिटची भिंत बांधणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे करूळ घाटातून शुक्रवारपासून वाहतूक सुरू होणार असल्याने वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. करुळ घाटामध्ये खचलेल्या रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून भिंत उभारण्याचे काम पूर्ण झालं आहे. बाजूपट्टी मजबुतीकरणाचे काम सुरू आहे.
सध्या वाहतूक फोंडाघाट आणि भुईबावडा घाटामार्गे सुरू होती. दरडी कोसळल्यानंतर क्राँक्रिट भिंत बांधण्याचे काम वेगाने सुरु होते. भिंतीचे काम काम पूर्ण झाल्याने बाजू पट्टीमजबूत करून वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. आता ज्या ठिकाणी रस्ता खचल होता, त्या ठिकाणाहून नजीकच आणखी एका ठिकाणी रस्ता खचला होता. त्या ठिकाणी काम सुरु करण्यात आले असून दोन-तीन दिवसात काम पूर्ण करण्यात येणार आहे. ही दोन्ही कामे 25 ऑगस्टपर्यत पूर्ण करून तळेरे- कोल्हापूर मार्गावर अवजड वाहतूक सुरू होणार आहे.
गणपतीला अनेक चाकरमानी मुंबईवरून व्हाया कोल्हापूर कोकणात जात असतात. तसेच कोल्हापूर मार्गे येणारे असतात. त्यामुळे गेल्या दोन आठवड़्यांपासून बंद असलेली वाहतूक पुन्हा एकदा गणपतीच्या तोंडावर सुरु होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
- Radhanagari Dam : पाणलोट क्षेत्रातील दमदार पावसाने राधानगरी धरणाचा एक दरवाजा पुन्हा उघडला
- satyapal singh baghel : कोल्हापूरचे दोन्ही खासदार भाजपचे असणार का? कायदा मंत्री सत्यपालसिंह बघेल म्हणाले...
- शेंदुराचा थर हटवल्याने बिनखांबी मंदिरातील इच्छापूर्ती गणेश तब्बल 190 वर्षांनी मुळ रुपात!
- Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील 410 ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना ओबीसी आरक्षणासह जाहीर