D Y Patil Sakhar Karkhana : डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातून इथेनॉल विक्री सुरु
D Y Patil Sakhar Karkhana : कोल्हापूर जिल्ह्यातील असळज (ता.गगनबावडा) येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातून उत्पादित झालेल्या इथेनॉलची विक्री सुरु झाली आहे.
![D Y Patil Sakhar Karkhana : डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातून इथेनॉल विक्री सुरु D. Y. patil sakhar karkhana starts Ethanol sales D Y Patil Sakhar Karkhana : डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातून इथेनॉल विक्री सुरु](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/550fe1dd93a3d007885bb2b23ffdbee7167240065964488_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
D Y Patil Sakhar Karkhana : कोल्हापूर जिल्ह्यातील असळज (ता.गगनबावडा) येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातून उत्पादित झालेल्या इथेनॉलची विक्री सुरु झाली आहे. विक्री केलेल्या इथेनॉलच्या पहिल्या पाच टँकरचे आज पूजन करण्यात आले.
कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु आहे. चालू वर्षात बी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलपोटी 1 कोटी लिटर इथेनॉल ऑईल कंपन्यांना पुरवठा करणेचा खरेदी आदेश कारखान्यास प्राप्त झाला आहे. इथेनॉल प्रकल्पामुळे कारखान्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार असून ऊसापोटी जास्तीत जास्त दर देणे कारखान्यास शक्य होणार आहे. चालू वर्षी 5.50 लाख मे. टन गाळपासह 2 कोटी लिटर इथेनॉल उत्पादन व सहवीज निर्मिती प्रकल्पातून 4.50 कोटी वीज युनिट्स निर्यात करणेचे उददिष्ट आहे. गळीत हंगाम सन 2022-23 साठी शेतक-यांनी पिकविलेला संपूर्ण ऊस गळीतास पाठवून कारखान्याने ठरविलेले गाळप उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी ऊस उत्पादकांना केलं आहे.
कार्यक्रमास कारखान्याचे व्हा. चेअरमन बंडोपंत कोटकर, संचालक मानसिंग पाटील, जयसिंग ठाणेकर, दत्तात्रय पाटणकर, गुलाबराव चव्हाण, चंद्रकांत खानविलकर, बजरंग पाटील, प्रभाकर तावडे, संजय पडवळ, महादेव पडवळ, अभय बोभाटे, रामचंद्र पाटील, सहदेव कांबळे, उदय देसाई, पांडुरंग पडवळ, रामा जाधव, कार्यकारी संचालक जयदिप पाटील, सेक्रेटरी नंदकुमार पाटील, सर्व खातेप्रमुख, उपखातेप्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर विभागात 1 कोटींवर टन गाळप
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील 21 कारखान्यांनी 68 लाख 71 हजार 67 टन उसाचे गाळप करुन 74 लाख 86 हजार 400 क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 11.30 टक्के आहे. 25 डिसेंबरअखेर कोल्हापूर विभागात 1 कोटी 4 लाख 47 हजार 314 टन ऊसाचे गाळप होऊन 1 कोटी 12 लाख 93 हजार 68 क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झालेले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा 11.33 टक्के इतका आहे. ऊस गाळपात हुपरीच्या जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने 8 लाख 56 हजार मे. टन उसाचे गाळप करत गाळपात आघाडी घेतली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)