एक्स्प्लोर

Chhatrapati Shahu Maharaj 75th birthday : 75 वर्षे आली कधी आणि गेली कधी हे कोल्हापुरात राहून कळालंच नाही; अमृतमहोत्सवी सोहळ्यात श्रीमंत शाहू महाराजांची प्रांजळ कबूली

कोल्हापूर कुस्तीपंढरी आहे, पण आपण मागे पडलोय पूर्वीचे स्थान मिळालं पाहिजे. 75 वर्षे आली कधी आणि गेली कधी हे कोल्हापुरात राहून कळालंच नाही, अशी प्रांजळ कबूली श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी दिली.

Chhatrapati Shahu Maharaj 75th birthday : कोल्हापूर कुस्तीपंढरी आहे, पण आपण मागे पडलोय पूर्वीचे स्थान मिळालं पाहिजे. आयुष्यातील 75 वर्षे आली कधी आणि गेली कधी हे कोल्हापुरात राहून कळालंच नाही, अशी प्रांजळ कबूली श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शाहू महाराज यांचा चांदीची गदा देऊन नागरी सत्कार करण्यात आला. 

छत्रपती शाहू महाराज मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, दोन तीन वर्षांनी मैदान भरलं हे पाहून आनंद झाला. राष्ट्रीय तालीम संघाने केलेल्या प्रयत्नांनी मैदान भरलं आहे. आयुष्यातील 75 वर्षे आली कधी आणि गेली कधी हे कोल्हापुरात राहून कळालंच नाही. मंडळींना नंतर लक्षात आलं की माझा 75 वा वाढदिवस साजरा केला पाहिजे. मला आवश्यकता नव्हती, पण घरच्या मंडळींना वाटलं म्हणून ठरवला. त्यामुळे कुस्ती शौकिन उपस्थित झाले.  

ते पुढे म्हणाले की, कोल्हापूर कुस्तीपंढरी आहे, पण आपण मागे पडलोय पूर्वीचे स्थान मिळालं पाहिजे. शाहू महाराजांपासून कुस्तीला प्रोत्साहान दिले. 1962 मध्ये कोल्हापुरात भोगा आणि पाकिस्तानच्या सादिकची कुस्ती झाली. ही तासभर कुस्ती चालली, इमाम बक्षचा पुतण्या जिंकला, पण सादीक हरूनही लोकप्रिय झाला. कोल्हापूरच्या कुस्त्या रंगतात तेव्हा चांगलं खेळणाऱ्याच्या मागे कुस्ती शौकिन असतात. असंच आजचं मैदान रंगलं आहे. मी सत्कार केल्याप्रसंगी आभार मानतो. 

शाहू महाराजांची विचारधारा, परंपरा सातत्याने छत्रपतींनी जपली

दरम्यान, शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले की, सत्ता हाती आल्यानंतर सामान्यांसाठी वापरायची असते, याचा आदर्श शिवछत्रपतींनी केला. अनेक राजवाडे होऊन गेले, पण त्यांची राज्ये त्यांच्या नावाने केली होती, पण एकच राज्य असं होतं जे कुटुंबाच्या नावाने नव्हते. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं राज्य रयतेचं राज्य होतं. ते हिंदवी स्वराज्य होतं. हा इतिहास छत्रपतींच्या घराण्यांनी जतन केला आहे. 

समतेची विचारधारा कृतीमध्ये आणण्यासाठी राजा कोणता याची चर्चा देशात होते तेव्हा पहिल्यांदा नाव छत्रपती शाहू महाराजांचे येते. ही शाहू महाराजांची विचारधारा, परंपरा सातत्याने छत्रपतींनी जपली याचा आनंद आहे. छत्रपती असूनही त्यांचे लक्ष शेवटच्या माणसासाठी आहे. महाराष्ट्रात अनेक संकटे आली, महापूर आला, कोरोनाचे संकट आले तेव्हा छत्रपती वाड्यात राहिले नाहीत, ते सामान्य माणसांचे दु:ख कमी करण्यासाठी रस्त्यावर आले. त्यांना कुस्तीच्या क्षेत्रात आस्था आहे. खेळाच्या क्षेत्रात आस्था आहे. अनेक शैक्षणिक संस्था उत्तमरित्या चालवण्यासाठी शाहू राजांनी भूमिका घेतली. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget