एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil: गोरगरीब मराठ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी राज्य सरकारचं षडयंत्र; आमरण उपोषणाला परवानगी नाकारल्याने मनोज जरांगे संतापले

Jalna News: मी हे सर्व उपोषण स्थगित केले होते. त्यामुळे स्थगित उपोषणाला वेगळी परवानगीची गरज नाही. मराठा आंदोलकांवररील केसेस मागे घेऊ सांगितले, आणखी केस दाखल केल्या हजारो पोरांवर, मनोज जरांगेंची टीका.

जालना: आंतरवाली सराटीतील काही ग्रामस्थांनी माझ्या उपोषणासाठी गावात परवानगी देऊ नये, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्याच्याआधारे पोलिसांनी माझ्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारली. हे राज्य सरकारचे षडयंत्र आहे. सरकारला गोरगरीब मराठ्यांचं आंदोलन (Maratha Reservation agitation) दडपायचे आहे. मी निवेदन देणाऱ्या गावकऱ्यांना दोष देणार नाही. गेल्या 10 महिन्यांमध्ये हे निवेदन का दिले नाही? निवेदनाच्या आधारावर माझ्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारणार असाल तर उद्या मी मोदींनी शपथ घेऊ नये, असे निवदेन देऊ का, असा सवाल मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी उपस्थित केला. ते शनिवारी आंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

मी लोकसभा निवडणुकीचा विषय सोडून दिला आहे. आता शांतता आहे. निवडणुकीत हार-जीत होत असते. आंतरवालीच्या ग्रामस्थांनी दिलेलं निवेदन जाणीवपूर्वक आहे. मग उद्या तुमच्या यात्रा निघतील, तेव्हा आम्हीही निवेदन देऊ. यात्रेमुळे रस्त्यावर रहदारीला त्रास होतो, विद्यार्थ्यांना शाळेत जायचे आहे, यात्रेमुळे जातीय तेढ निर्माण होईल, असे आम्हीही निवेदनात सांगू. मग पोलीस त्या यात्रा रद्द करणार का, असा सवालही जरांगे पाटील यांनी विचारला.  मला परवानगी प्रशासनाने नाही तर सरकारने परवानगी नाकारली आहे. आंतरवाली सराटीत उपोषणस्थळी समाज बांधवांनी येऊ नये. सध्या पेरणीचे दिवस आहेत. या लढ्यासाठी मी खंबीर आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडू न देण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक ,गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्‍यांची आहे. याठिकाणी काही झालंच तर काही झालंच तर याला जबाबदार निवेदन देणारेच असतील, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मी फक्त कायदा आणि घटनेला मानतो, कायदा चालवणाऱ्याला मानत नाही; मनोज जरांगे पाटील संतापले

आम्हाला घटनेने आणि जनतेने शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मी आता घटनेला मानायला लागलोय, कायदा चालवून घेणाऱ्याला मी मानत नाही. जो कायदा चालवायला मराठ्यांनी त्या पदावर बसवलाय, तो कायदा पायदळी तुडवायला लागला आहे. 4 तारखेला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता होती, मी आचारसंहितेचा सन्मान केला आहे. मी 8 तारेखला उपोषण पुढे ढकललं, पण पुन्हा तुम्ही परवानगी नाकारली. तुम्ही वारंवार परवानगी नाकारणार असाल तर तुम्ही नाकारलेल्या परवानगीला मानत नाही, मी कायद्याला मानतो. मी घटनेला मानतो, मला कायद्याने अधिकार दिला आहे. मी सकाळी आमरण उपोषणाला बसणार आहे, मी मागे हटणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला.

आणखी वाचा

आम्ही तुमच्यासोबत, 50 गाड्यांचा ताफा घेऊन अजित पवारांचे आमदार मनोज जरांगेंच्या भेटीला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शासकीय वाहनांसाठी पेट्रोलसह डिझेलचा साठा शिल्लक ठेवा, जालन्यात पुरवठा अधिकाऱ्यांचे आदेश 
शासकीय वाहनांसाठी पेट्रोलसह डिझेलचा साठा शिल्लक ठेवा, जालन्यात पुरवठा अधिकाऱ्यांचे आदेश 
धनंजय मुंडेंना मोठा दिलासा, अंजली दमानियांचे सर्वच आरोप लोकायुक्तांनी लावले फेटाळून, नेमके काय होते आरोप? 
धनंजय मुंडेंना मोठा दिलासा, अंजली दमानियांचे सर्वच आरोप लोकायुक्तांनी लावले फेटाळून, नेमके काय होते आरोप? 
परळीचं खरखटं, हे सगळं धन्याच घडवून आणतो; अमोल खुणेच्या मागणीनंतर मनोज जरागेंचा पलटवार, चांगलेच संतापले
परळीचं खरखटं, हे सगळं धन्याच घडवून आणतो; अमोल खुणेच्या मागणीनंतर मनोज जरागेंचा पलटवार, चांगलेच संतापले
मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करा, SIT चौकशी करा, अमोल खुणे  यांची मागणी, मी सुटू नये म्हणून वकील मॅनेज केले 
मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करा, SIT चौकशी करा, अमोल खुणे  यांची मागणी, मी सुटू नये म्हणून वकील मॅनेज केले 

व्हिडीओ

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Sachin Ahir : राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर 
सोने चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक, चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Nitish Kumar: नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
Embed widget