एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil : सरकार म्हणून तुम्हाला लाज वाटत नाही का? रोष अंगावर का घेताय? मनोज जरांगे बरसले!

Manoj jarange Patil : सरकार म्हणून तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही का रोष अंगावर घेत आहात, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे.

Manoj jarange Patil : विरोधकांनी बैठकीला जायलाच हवे होते. पण ते गेले नाही म्हणून तुम्ही ते कारण आम्हाला सांगणार का?  सरकार म्हणून तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही का रोष अंगावर घेत आहात, अशी टीका मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारवर (Maharashtra Government) केली आहे. तसेच सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही. सगेसोयची अंमलबजावणी घेणारच आहे. मी सरकारला सावध करतोय, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीबाबत सरकारला दिलेल्या अल्टीमेटमचा आज शेवटचा दिवस आहे. यावरून मनोज जरांगेंनी सरकारवर निशाणा साधला आहे. 

मनोज जरांगे म्हणाले की, अल्टीमेटमबाबत सरकारसोबत बोलणे झालेले नाही. आज सरकारला पूर्ण दिवस आहे. पुढील निर्णय काय घ्यायचा? हे समजाशी बोलून घेणार आहे. आजचा दिवस काही बोलता येणार नाही. आजचा पूर्ण दिवस त्यांच्याकडे आहे. रॅलीचा पुढील टप्पा पश्चिम महाराष्ट्रात असेल. शिंदे समितीने नोंदी शोधण्याचे काम सुरू करावे. मुलींच्या मोफत शिक्षणाचा विषय आहे. सर्व जाती धर्माच्या मुलांना न्याय मिळावा. आम्ही जातीयवादी नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. 

सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही

मराठा आरक्षणाबाबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधक उपस्थित नव्हते. याबाबत विचारले असता मनोज जरांगे पाटील म्हणाले की, विरोधकांनी बैठकीला जायलाच हवे होते. पण ते गेले नाही. म्हणून तुम्ही ते कारण आम्हाला सांगणार का? तुम्ही सरकार आहात. विरोधक नाही आले तरी तुम्ही सांगितले पाहिजे, त्यांचे कारण सांगून तुम्हाला द्यायचे आहे नाही का? तुम्ही का रोष अंगावर घेत आहात. सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही. सगेसोयची अंमलबजावणी घेणारच आहे. मी सरकारला सावध करतोय. तुमच्यावर टीका करत नाही. पण आरक्षण दिले नाही तर 100 टक्के 288 उमेदवार पाडणार आहे. मराठ्यांच्या मताच्या जीवावरच आताचे आमदार झालेत, असे निशाणा त्यांनी यावेळी सरकारवर साधला. 

त्यांना संविधानाने दिलेला अधिकार

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सगेसोयरे अध्यादेशाला विरोध केला. याबाबत मनोज जरांगे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, द्या म्हणण्याचा नाही म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांना वाटलं असेल नाही द्यावे, म्हणून ते नाही म्हटले. त्यांना संविधानाने दिलेला अधिकार आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. 

सरकार लबाड, ओबीसी नेत्यांना आमच्या अंगावर घालतंय

ते पुढे म्हणाले की, राज्यात मराठ्याच्या हातात पॉवर राहिली पाहिजे ही माझी भूमिका आहे. सगेसोयरे उडणारे असेल तर रद्द करा मागणी का होते? छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) का झोपत नाहीत. मी मराठ्यांना  काहीना काही देऊ शकलो. 100 टक्के मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिले आहे. मी काहीना काही समाजाला दिले ना. तुमच्यासारखं अर्ध्यात तर आंदोलन सोडले नाही ना? काही जणांना माझं आंदोलन पचणीच पडेना. 40 वर्ष तुम्ही काय केलं? जर आरक्षण उडणारे असते तर ओबीसीचे नेते एकत्र आलेच नसते. सरकार लबाड आहे. ओबीसींच्या नेत्यांना आमच्या अंगावर घालतेय. ओबीसींनी समजून घ्यावं विरोध केला नाही. तरी मराठ्यांचेच सरकार येणार, म्हणून तुम्ही विरोध करू नका. इतका मग्रूरराज कधीच असू नये, महिला रस्त्यावर उतरून सरकार ऐकत नाही. विरोधी पक्षाला 70 वर्ष मतदान केले. भाजप मधल्या सामान्य मराठ्यांना वाटायला लागले, हे कामाचेच नाही. सरकार ला सकाळी  उठायला वेळ लागतो. 

आणखी वाचा 

Maharashtra Election : निवडणुकीच्या तोंडावर भाजपममध्ये मुख्यमंत्रिपदासाठी कोणाला सर्वाधिक पसंती? सर्व्हेतून आकडेवारी समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Chandiwal Ayog : 100 कोटी खंडणी प्रकरण, इनसाईड स्टोरी काय?Sanjay Shirsat On Chandiwal : 'चांदीवाल ते सचिन वाझे' गौप्यस्फोटांवर शिरसाट यांची प्रतिक्रियाVidhan Sabha Manchar Reaction : सख्ख्या भावांनी आम्हाला रडवलं मंचरकरांचा मूड कुणाच्या बाजूने?Chitra Wagh Akola On Supriya Sule : बारामतीच्या ताईंनी आपल्या अडाणीपणाचे प्रदर्शन नाही केलं पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Donald Trump : दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
Embed widget